नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. हिंदुस्‍तान एयरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) ने भारताच्या शत्रूंना हा इशारा दिला आहे. एचएएलने एक असं हल्क हॅलिकॉप्टर तयार केलं आहे जे शत्रूंच्या विमानांना किंवा मिसाईलला हवेतच नष्ट करेल. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे चालता-फिरता टार्गेटवर देखील याने योग्य नेम लावता येतो. लवकरच ते भारतीय हवाईदलाला सोपवलं जाणार आहे.


ऑपरेशनल सेवांसाठी तयार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचएएलचे प्रमुख आर माधवन यांनी म्हटलं की, 'देशात पहिल्यांदा हवेतून हवेतच वार करणारं हॅलिकॉप्टर बनवण्यात मोठं यश मिळालं आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही सैन्‍य सेवेकडे या प्रकारची क्षमता असलेलं हॅलिकॉप्टर नाही. आता लाईट कॉम्‍बॅट हेलिकॉप्‍टरच्या हत्यारांसंबंधित सगळे परीक्षण पूर्ण झाले आहेत. हे हॅलिकॉप्टर ऑपरेशनल सेवांसाठी पूर्णपणे तयार आहे.'


एचएएलचे प्रवक्ते गोपाल सुतर यांनी म्हटलं की, ओडिशाच्या चांदीपूरमध्ये झालेल्या परीक्षणात हॅलिकॉप्‍टरने यशस्वीरित्या हवेत मिसाईल सोडत लक्ष्य गाठलं. या परीक्षणात पायलट विंग कमांडर सुभाष पी जॉन (वीएम रिटायर्ड), एचएएलचे फ्लाइट इंजीनियर कर्नल रंजीत चिताले, भारतीय वायुसेनेचे टेस्‍ट पायलट ग्रुप कॅप्‍टन राजीव दुबे सहभागी आहेत.


सियाचिन सारख्या ठिकाणी मदत


या हलक्या युद्धक हेलिकॉप्‍टरसोबत मागच्या वर्षी २० एमएमच्या शक्तिशाली टुरेट गन आणि ७० एमएमचे रॉकेट देखील परीक्षण करण्यात आले. एचएएलचा दावा आहे की, हे हॅलिकॉप्‍टर जगभरातील एक असं हॅलिकॉप्टर आहे जे सियाचिन सारख्या दुर्गम भागात देखील उंच स्थानी काम करु शकतं.


अचूक लक्ष्य भेदणार


या हॅलिकॉप्‍टरला एचएएलच्या रोटरी विंग रिसर्च अँड डिजाइन सेंटरने डिझाईन आणि विकसित केलं आहे. भारतीय वायुसेनेने त्यांच्या आवश्यकतेनुसार हे बनवून घेतलं आहे. याच्या वरच्या भागावर एक खास इंफ्रारेड साइटिंग सिस्‍टम लावण्यात आलं आहे. यामुळे आतमध्ये असलेल्य़ा पायलटला जमीन आणि हवा या दोन्ही ठिकाणी असलेले शत्रू शोधून त्यांना संपवता येईल. 


१५ हॅलिकॉप्‍टरची खरेदी


या अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने बनवण्यात आलेल्या हॅलिकॉप्टरमुळे मागे न फिरताच मिसाईल सोडता येणार आहे. याची मिसाइल अनमँड एरियल व्‍हीकल (यूएवी) आणि हलक्या विमानांना देखील नष्ट करु शकते. हे विमान दुर्गम भागात देखील उड्डाण करु शकतं. सोबतच घसरत्या जागेवरुन देखील उड्डाण भरु शकतं. सुरक्षेच्या दृष्टीने हे एक छत्रीचं काम करणार आहे. डिफेंस एक्‍वीजिशन काउंसिल (डीएसी) ने सुरुवातीला १५ हॅलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून यापैकी १० भारतीय वायुदलाला तर ५ लष्कराला देण्यात येणार आहे.