अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?
India Missile: अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.
Indian Missile: भारत क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. शत्रुचा हल्ला परतवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. क्षेपणास्त्रे ही स्व-चालित उडणारी शस्त्रे आहेत जी उच्च गतीने आणि अचूकतेने स्फोटक शस्त्रांचा मारा करण्यासाठी, त्यांचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली असतात.भारताकडे विविध प्रकारची क्षेपणास्रे आहेत. नुकतेच भारताने अग्नी 5 चे यशस्वी उड्डाण केले. दरम्यान अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.
अग्नी 1
अग्नी 1 क्षेपणास्त्र डिसेंबर 2023 मध्ये लॉंच करण्यात आलं. अग्नि 1 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज मध्यम स्वरुपाची आहे. अग्नी 1 ची रेंज 700 किमी पर्यंत आहे. तसेच या क्षेपणास्त्राचं वजन 12 टन आहे. अग्नी 1 आपल्यासोबत 1 हजार किलो अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतं. अग्नि १ क्षेपणास्त्राला अत्याधुनिक सिस्टिम प्रयोगशाळेनं संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटरसह विकसित करण्यात आलं आहे.
अग्नी 2
अग्नी 2 नोव्हेंबर 2019 मध्ये लॉंच करण्यात आलं. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. या क्षेपणास्राची लांबी 21 मीटर, रुंदी 1 मीटर आणि वजन 17 टन आहे. या माध्यमातून 1000 किलोग्रॅमपर्यंत विस्फोटक नेण्याची क्षमता आहे. तर याची मारक क्षमता 2 हजार किलोमीटर इतकी आहे.
अग्नी 3
अग्नी 3 हे क्षेपणास्त्र नोव्हेंबर 2022 मध्ये लॉंच करण्यात आले. हे मध्यम रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याद्वारे 3500 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधला जाऊ शकतो. अग्नी 3 ची लांबी 17 मीटर आणि व्यास 2 मीटर आहे. हे क्षेपणास्त्र एका सेकंदामध्ये 5 किलोमीटर अंतर कापू शकते. यातून 1.5 टन वजन नेता येऊ शकते.
यामध्ये अत्याधुनिक हायब्रिड नेव्हिगेशन, गायडन्स आमि कंट्रोल सिस्टिम आहे. ज्यामुळे क्षेपणास्त्रवर असलेली अद्ययावत कॉम्प्युटर यंत्रणा चालते. या नेव्हिगेशन सिस्टिममुळे अग्नी 3 क्षेपणास्त्राचा निशाणा अचूक आहे. या क्षेपणास्त्राचे एकूण वजन 50 टन आहे.
अग्नी 4
जून 2022 मध्ये अग्नी 4 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये जमिनीवरुन 4 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. 20 मीटर लांब, दीड मीटर रुंद आणि 17 टन वजनाच्या या क्षेपणास्त्रमध्ये एक हजार किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.अग्नी 4 क्षेपणास्त्र अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यात पाचव्या पिढीचे कॉम्प्युटर बसवले आहेत. त्याची आधुनिक वैशिष्ट्ये फ्लाइट दरम्यान आपोआप बिघाड दुरुस्त करू शकतात. स्वदेशी विकसित रिंग लेझर गायरो आणि संमिश्र रॉकेट मोटर त्याची क्षमता आणखी वाढवतात. दीड मीटर उंचीवरील अगदी लहानशा लक्ष्यांनाही ते नष्ट करु शकतात.
अग्नी 5
मार्च 2024 मध्ये अग्नी 5 हे क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अग्नी मालिकेतील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5000 किमीपेक्षा जास्त आहे. भारताने डिसेंबर 2022 मध्ये 5000 किमी पेक्षा जास्त पल्ला असलेल्या अण्वस्त्र-सक्षम अग्नी-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. याद्वारे एकच क्षेपणास्त्र वेगवेगळ्या युद्धक्षेत्रांना लक्ष्य केले जाते. किंवा एकाच लक्ष्यावर वारंवार निशाणा साधला जाऊ शकता. यात स्वदेशी प्रणाली वापरण्यात आली आहे. मिशन दिव्यस्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत MIRV क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे.