मुंबई : दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. चीनमध्ये उदयास आलेल्या या धोकादायक वादळाने संपूर्ण जगातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ५४१ वर गेले आहे. तर कोरोना या धोकादायक व्हायरसने आतापर्यंत ३५८ जणांचा बळी घेतला आहे. या दिलासा देणारी बातमी म्हणजे १ हजार २०५ रुग्ण या आजारातून बाहेर पडले आहेत. कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे.  सोमवारी उशिरापर्यंत  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ३३४ होती. परंतु आज रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने महाराष्ट्राची रुग्णसंख्या २४५५ इतकी झाली आहे. तर १५५ पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील ९२, नवी मुंबईतील १३, ठाणे १०, वसई-विरारमधील ५ तर रायगडमधील एकाचा समावेश संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.