Shocking News : 32 वर्षांचा ऑटोरिक्शा चालकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. ए माधन कुमार, ए धनुष, के जयप्रकारश आणि एस भरत असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीने पोलीसही हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार आरोपींनी रविचंद्रनचा बेदम मारहाण करून खून केला आणि नंतर मृतदेहासोबत सेल्फी काढला. इतकंच नाही तर आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी मित्रांच्या ग्रुपवर सेल्फी शेअर केला. ही धक्कादायक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या फोटोच्या आधारे पोलिसांनी या घटनेतील चार आरोपींना अटक केली.


मृत रविचंद्रनचं काही दिवसांपूर्वी जुने नप्पलयम इथले रहिवासी असलेल्या माधन कुमार आणि त्याच्या मित्रांशी भांडण झालं होतं. पण हेच भांडण आपल्या मृत्यूचं कारण बनेल असं रविचंद्रन याने कधी विचारही केला नव्हता.  बुधवारी माधनने रविचंद्रनला मनाली न्यू टाऊन इथल्या मैदानावर दारू पिण्यासाठी बोलावलं. आपल्यातलं भांडण आपण एकत्र बसून मिटवू असं त्याला सांगितलं. 


रविचंद्रनही माधनने बोलावलं त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला. दुसरीकडे घरी परतायला उशीर झाल्याने रविचंद्रनची पत्नी कीर्तनाला काळजी वाटू लागली. तिने रवीचंद्रनच्या मोबाईलवर फोन केला, मात्र फोन बंद होता. यानंतर कीर्तना तिच्या नातेवाईकांसह रविचंद्रनच्या शोधात निघाली.


रविचंद्रनचा शोध घेत सर्वजण वेत्रीनगर इथल्या मैदानावर पोहोचले. मैदानाच्या एका कोपऱ्यात रविचंद्रनचा पडला होता आणि चारही आरोपी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते. किर्तना आणि नातेवाईक तिथे पोहचताच चारही आरोपी तिथून निघाले पण निघताना त्यांनी किर्तनालाही धमकी दिली.


यानंतर रविचंद्रनची पत्नी आणि नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते, तर रविचंद्रनचा मृत्यू झाला होता. 


सेल्फीमुळे पोलिसांना मारेकऱ्यांची ओळख पटली. मृताच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक स्थापन करत चारही आरोपींना अटक केली.