प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाची तारीख महत्त्वाची असते. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. काही जोडपी बाहेर फिरायला जाऊन साजरा करतात, तर काही जोडपी कँडल लाईट डिनरला जातात. काही जणं एकमेकांना या दिवशी छानसं गिफ्ट देऊन सरप्राईज देतात. पण चुकून हा दिवस पती हा दिवस विसरला तर. तर मात्र त्या पतीचं काही खरं नसतं. नाराज झालेल्या पत्नीची समजूत काढताना पतीच्या नाकेनऊ येतात. असा काहीसा पण धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या लग्नाच्या वाढिवशी पत्नीला गिफ्ट (Wedding Anniversary Gift) न देणं एका पतीच्या जीवावर बेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीचं धक्कादायक पाऊल
बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रायव्हेट कंपनीत काम करणार एक व्यक्ती आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरला. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला गिफ्ट दिलं नाही. यावरुन पत्नी चांगलीच संतापली. संतापाच्या भरात तीने धक्कादायक पाऊल उचललं. पती घरी कामावरुन परतल्यानंतर जेऊन झोपला. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हेच त्याच्या डोक्यात आलं नाही. पतीने काहीच गिफ्ट आणलं नसल्याने पत्नीच्या अंगाचा तिळपापड झाला होता. 


या गोष्टीचा बदला घेण्याचा तीने ठरवलं. जेऊन पती झोपल्यानंतर पत्नीने किचनमधून चाकू आणला आणि पतीवर सपासप वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. पतीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पतीला रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय जातंय.


या कारणाने वाढदिवस साजरा केला नाही
लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संतापाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केल्याची पत्नीने पोलिसांसमोर कबुली दिली. तर पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आजोबांच्या मृत्यूमुळे लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नव्हता असं त्याने सांगितलं. पीडित पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.


वडिलांच्या व्यसनाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
दरम्यान, उत्तरप्रदेशमधल्या कनपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणीने आपल्या वडिलांच्या व्यसनाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूपूर्वी या मुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. मृतू मुलीच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं. यावरुन घरात कलह निर्माण होत होता. वडिलांच्या दारुच्या व्यसनाने मृत तरुणी त्रासली होती. यामुळे तीने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.