बंगळुरु : अवकाश जगात भारताचे (India in Space) वर्चस्व वाढत आहे. या संदर्भात, 28 मार्च रोजी नवीन मिशन तयार आहे. भारताच्या भू-सागरी सीमारेषांवर नजर ठेवण्यासाठी विशेष उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थ ऑब्जर्वेशन सेटेलाइट (Earth Observation Satellite) प्रत्यक्ष स्थितीची (Real time) छायाचित्र पाठविल. याच्या सहाय्याने नैसर्गिक आपत्तींचे त्वरित निराकरण करणे देखील शक्य होईल. तसेच शत्रूंच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरून जीएएसएलव्ही-एफ 10 च्या 10 (GSLV-F10) माध्यमातून एसएटी -1 लॉन्च केले जाईल. इस्रोच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला हा भौगोलिक-इमेजिंग उपग्रह 28 मार्च रोजी प्रक्षेपित करायचा आहे, हे हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असले तरी.” हा उपग्रह 36,000 किमी उंचीच्या कक्षेत ठेवण्यात येणार आहे.


'सुपरव्हिजन उपग्रह'


तांत्रिक कारणांमुळे जीएसएलव्ही-एफ 10 मार्गे जीसॅट -1 लॉन्च करणे पुढे ढकलले गेले. मागील वर्षी 5 मार्च रोजी हे लॉन्च केले जाणार होते. अंतराळ विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हे एका अर्थाने भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे." उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यांमुळे हे उपग्रह भारतीय भूभाग आणि महासागराचे निरंतर देखरेख ठेवण्यास मदत करेल.”जीसॅट -1 चे वजन 2,268 किलो ग्रॅम आहे आणि अत्याधुनिक निरीक्षण उपग्रह आहे.


शत्रूवर 'तिसर्‍या डोळ्या'ची नजर


महत्त्वाचे म्हणजे हे भूभागावरील देखरेखीसाठी पाठवलेले उपग्रह प्रक्षेपित झाल्यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्थाही बळकट होईल. अंतराळातील भारताच्या 'तिसर्‍या डोळ्या'मुळे आपले सैन्य देशाच्या शत्रूंच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवेल. सीमेवरील देखरेखीच्या कामातही सहजता येईल. हा उपग्रह सीमांच्या प्रत्यक्ष स्थितीची (Real time) छायाचित्र पाठवेल.


मोठे यश


28 फेब्रुवारी रोजी इस्रोने आपले कमर्शिअल युनिट ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ (NSIL)च्या पहिल्या समर्पित मोहिमेअंतर्गत रविवारी ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया -1 चे आणि 18 अन्य उपग्रहांचे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) सी -51 च्या माध्यमातून श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झाले. या 18 पैकी पाच उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केले होते.


अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष के. सिवन (K Siwan) म्हणाले की जीसॅट -1 अभियान पुढे काही त्रांतिक कारणामुळे पुढे ढकलेल्याने अनेक तांत्रिक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहेत. कोविड-19च्या (Covid-19) लॉकडाऊनमुळे सामान्य कामकाजावर परिणाम झाला म्हणून अनेक प्रक्षेपणांवर आणखी विलंब झाला आहे.