मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडिया पोस्टने बिहार सर्कलमधील दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांवर बंपर भरती सुरु केली आहे. यासाठी एकूण 1 हजार 940 पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये शाखा पोस्ट मास्टर (Branch Post Master), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (Assistant Branch Post Master (ABPM) आणि डाक सेवक (Dak Sevak) या पदांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भरतीबद्दल अधिक माहिती तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाइट appost.in किंवा https://appost.in/gdsonline/ या संकेत स्थळाला भेट देऊन मिळवू शकता.


India Post GDS Recruitment 2021:


इंडिया पोस्टच्या भरती अधिसूचनेनुसार 4 तासांच्या सेवेसाठी शाखा पोस्ट मास्टरला (Branch Post Master) 12 हजार रुपये वेतन. तसेच सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (Assistant Branch Post Master (ABPM) आणि डाक सेवकाला (Dak Sevak) 10 हजार रुपये वेतन मिळेल.


त्याचबरोबर 5 तासांच्या सेवेसाठी तुम्हाला अनुक्रमे 14 हजार 500 आणि 12 हजार वेतन मिळेल.


तारीख लक्षात ठेवा


ऑनलाइन अर्ज प्रारंभ तारीख - 27 एप्रिल 2021


ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 मे 2021


वयोमर्यादा


या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असणे आवश्यक आहे. वय गणना 27 एप्रिल 2021 पासून केली जाईल.


राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सूट देण्यात येईल. बिहार मंडळात अर्ज करणाऱ्यांना हिंदी भाषा येणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणा ऱ्यां उमेदवारांकडे दुचाकी / मोटारसायकल असायला हवे.


शिक्षण


मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलेली असावी. दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असायला हवे.


तांत्रिक शिक्षण


मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 60 दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षणात संगणकाचा विषय म्हणून अभ्यास केला असेल त्यांना मूलभूत संगणक माहिती प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल.


कृपया अर्ज करण्यापूर्वी भरती अधिसूचना तपासा.


अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.


अर्ज करण्याची वेबसाइट - https://appost.in/gdsonline/


निवड प्रक्रिया


ऑनलाईन सादर केलेला अर्ज तपासल्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांवर आधारित असेल.


जर अर्जदाराने प्राधान्याने पाच पदांची निवड केली असेल आणि गुणवत्तेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठी निवड झाली असेल, तर त्याची एकाच पदासाठी निवड केली जाईल.