मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही या संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ६१ हजार २६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज ८८४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६ लाख ८५ हजार ८३ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा हा १ लाखाच्यावर आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील एकूण ६६ लाख ८५ हजार ८३ करोनाबाधितांमध्ये ९ लाख १९ हजार २३ ऍक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ५६ लाख ६२ हजार ४९१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाक ३ हजार ५६९ जणांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.


कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याच काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोना व्हॅक्सीनच्या ब्लू प्रिंटबद्दल माहिती दिली. त्यांच म्हणणं आहे की, पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस तयार होईस. कोरोनाच्या व्हॅक्सीनबाबत जगभरात प्रयत्न सुरू आहे.



अनेक देशांनी तर व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा देखील केली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याच व्हॅक्सीनला जगभरात वापरण्याची परवानगी मिळालेली नाही. अशातच आरोग्य मंत्र्यांनी १३० करोड भारतीय जनतेने दिलासादायक माहिती दिली आहे.