नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगभरातील देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान भारतातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतामध्ये एका दिवसात आरोग्यकर्मचाऱ्यांच्या मदतीने १४०० जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील सर्वच देश कोरोनाशी लढत आहेत. यावरील लसीचे संशोधन केले जात आहे. कोरोना चाचणीची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोनाचे निदान होऊ शकल्याने त्याला आटोक्यात आणणे 


जगभरात कोरोनाचे ३७ लाख २७ हजार ९३६ रुग्ण आढळले. हा आकडा खूपच चिंताजनक आहे. तरी वाढत्या रुग्णांच्या संख्येसोबतच बऱ्या होणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होतेय ही दिलासादायक बातमी आहे. जगभरात आतापर्यंत १२ लाख ४२ हजार ४३२ रुग्णांना बरे करण्यात यश आले आहे. 



आयलॅंडमध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रीनलॅंडमध्ये ११ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. फॉल्कलॅंडमध्ये १३, पापुआ न्यु गिनीमध्ये ८, सेंट बार्थलीमध्ये ६, अंगुलियामध्ये ३ रुग्ण आढळले. या सर्वांना बरे करण्यात यश आले आहे.


देशात २४ तासात रुग्ण वाढले


गेल्या २४ तासांमध्ये भारतात रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. २४ तासात २९०० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे भारतातील रुग्णसंख्या ४९ हजार ३९१ झाली आहे. 


एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 15 हजार 535 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 617 जणांचा बळी गेला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत महाराष्ट्र महिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 2 हजार 819 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 


कोरोनाच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 6 हजार 245 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये 1381 लोक बरे झाले असून 368 जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्ली कोरोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर असून 5 हजार 104 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत 64 जणांचा मृत्यू झाला असून 1468 जण बरे झाले आहेत. 


मध्यप्रदेश 3049, पंजाब 1451, राजस्थान 3158, तमिळनाडू 4058, तेलंगाणा 1096, उत्तर प्रदेश 2880, पश्चिम बंगालमध्ये 1344 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 


कोरोना रुग्णांना वाचवण्याचा आकडा वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगतेय. आतापर्यंत १४ हजार १८२ रुग्णांना कोरोनामुक्त होऊन घरी पाठवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ हजार ४५५ रुग्णांना वाचवण्यात आले आहे. हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे.