मुंबई : भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत १० ते १२ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. सुपर सायक्लोन अम्फान या वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मोठी पडझड पाहायला मिळत आहे. दरम्यान,  पश्चिम बंगालमध्ये पाच लाख आणि ऑडिशात 1,58,640 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर सायक्लोन अम्फान (Amphan Cyclone)  दक्षिण पश्चिमेकडील दीघा किनारपट्टीला धडकले आहे. या धडकेनंतर काहीवेळातच चक्रीवादळाने आपले रौदरुप दाखवले. या वादळाने मोठा हाहाकार उडवला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील काही लोकांना आपल्या जीव गमवावा लागला आहे. 



पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळात जवळपास १० ते १२ लोकांना मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.  उत्तर आणि दक्षिण २४ परगनात मोठी हानी झाली आहे. कोलकातामध्ये वादळाचा तडाखा बसला. या वादळातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.


कोलकाताला मोठा चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची  एक टीम पोहोचली आहे. ही टीम संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे. पश्चिम बंगालमध्ये अद्याप पाच लाख आणि ऑडिशात 1,58,640 लोक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.


एनडीआरएफच्यी टीमसोबत देशातील तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी सतर्क झाले असून ते अॅक्टीव मोडमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारीक लक्ष ठेवून आहेत.