मुंबई : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. भारताने गुरुवारी ब्रिटनलाही मागे टाकले आहे. आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. भारतात कोरोनाचे २,९७,२०५ रुग्ण आहेत. ही माहिती 'वर्ल्डमीटर' ने दिली आहे. याआधी भारताने चीनलाही मागे टाकले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग सात दिवस भारतात ९,५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. एका दिवसात मृतांची संख्याही प्रथमच ३०० च्या वर गेली आहे. 'वर्ल्डमीटर' च्या आकडेवारीनुसार, कोविड -१९चा सर्वाधिक प्रभावित भारत चौथा देश आहे. त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण अमेरिका २०,७६,४९४, ब्राझील ७,८७,४९८, रशिया ५,०२,४३६ आहेत. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १ लाख ४१  हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारपर्यंत एका दिवसात सर्वाधिक ९,९९६रुग्ण आढळले आणि ३५७ लोक मरण पावले. संसर्गाचे एकूण २,८६,५७९ रुग्ण आहेत. संक्रमित लोकांपैकी ८,१०२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह, सलग दुसऱ्या दिवशी असे घडले की बरे होण्याचा प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती. आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाच्या एकूण संख्येमध्ये १,३७,४४८  संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत, तर १,४१,०२८ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत आणि एक रुग्ण देशाबाहेर गेला आहे.


महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण


महाराष्ट्रात सर्वाधिक ९४०४१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे ३६,८४१ , दिल्लीत ३२८१०, गुजरातमध्ये २१५२१, उत्तर प्रदेशात ११६१० राजस्थानमध्ये ११,६०० आणि मध्य प्रदेशात १००४९ रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये९३२८ , कर्नाटकमध्ये ६०४१ , बिहारमध्ये५७१० , हरियाणामध्ये५५७९,जम्मू-काश्मीरमध्ये४५०९, तेलंगणामध्ये ४१११ आणि ओडिशामध्ये ३२५० संसर्ग झालेल्यांची संख्या आहे.