श्रीहरिकोटा : शत्रूचा सहज वेध आणि अचूक मारा करणाऱ्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची (Ballistic Missile, Agni-5) यशस्वी चाचणी घेण्यात आली. 5000 किमीपर्यंत सहज मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताच्या लष्करी सामर्थ्यांत मोठी भर पडली आहे. जमिनीवरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र  (Agni 5 Missile) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हवेत डागण्यात आले. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने भारताच्या शेजारील देशांना धडकी भरली आहे.


चीनच्या खुरापतीनंतर भारताचे अचूक टायमिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अग्नी-5'ची यशस्वी (Agni-5 Successfully Launched) चाचणी ही भारताच्या विश्वासार्ह किमान प्रतिबंध साध्य करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. शेजारील चीनसोबतच्या सीमेवर दीड वर्षांहून अधिक काळ तणाव असताना भारताने या क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी घेतली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारतात दहशतवादी पाठवून वातावरण बिघडवण्याचा कट रचत आहे.


'अग्नी-5'ची ही वैशिष्ट्ये


- या क्षेपणास्त्रात थ्री-स्टेज ठोस इंधनाचे इंजिन वापरण्यात आले आहे
- 5,000 किमी अंतरावरील लक्ष्य अत्यंत अचूकतेने भेदण्यास सक्षम.
- तीन टप्प्यांत लक्ष्यावर मारा करु शकते
- 17 मीटर लांब, दोन मीटर रुंद.
1.5 टनांपर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात