Greater Noida News : दिल्लीतल्या 15 वर्षांच्या कुणाल शर्माच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेने (Kunal Sharma Murder Case) संपूर्ण देश हादरला होता.  ग्रेटर नोएडातले हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एमबीबीएसच्या विद्यार्थिनीसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या कबुली जबाबात हादरवणारी माहिती समोर आली आहे. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी नेटफिल्क्सवर (Netflix) HIT नावाची वेबसीरिज पाहून हे हत्या प्रकरण घडवून आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का केली कुणालची हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कृष्णा शर्मा यांच्या हॉटेवर कब्जा करायचा होता. याशिवाय आरोपी आणि कृष्णा शर्मा यांच्यात पैशांवरुनही वाद सुरु होता. त्यामुळे बदला घेण्याच्या इराद्याने आरोपींनी कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांचा मुलगा कुणालच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला. या संपूर्ण कारस्थानात एमबीबीएसची एक विद्यार्थिनीचाही समावेश होता. या मुलीचा फोटो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओत कुणाल एका मुलीबरोबर कारमध्ये बसताना दिसत आहे.


हॉटेलवर कब्जा करण्यासाठी कट
पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला आहे. कृणालच्या हत्येचा कट त्याचा काका आणि एका तरुणाने रचला होता. या पैकी तरुणाने कृष्णा शर्मा यांच्याकडून व्याजावर अडीच लाख रुपये घेतले होते. तर काकाला कृष्णा शर्मा यांच्या हॉटेलवर कब्जा करायचा होता. या दोघांनी आपल्या कटात एबीबीएस शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला सहभागी करुन घतेलं. यात मुलीने आपल्या कारने कुणालला गोड बोलून आपल्या कारमध्ये बसवलं आणि त्याचं अपहरण केलं. 


कुणालचं अपहरण केल्यानतंर आरोपींनी त्याचे हात-पाय बांधले आणि त्याला एका बॅगेत भरलं. यानंतरत्याला कारने दिल्लीच्या सेक्टर 127 मधल्या जेपी विश टाऊन इमारतीतील एका प्लॅटमध्ये नेलं. त्याच दिवशी त्याच फ्लॅटमध्ये आरोपींनी 15 वर्षांच्या कुणालची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये ठेऊन बुलंदशहरमध्ये नेला. तिथे एका कारमध्ये त्यांनी कुणालचा मृतदेह फेकला.


वेबसीरीज पाहून हत्याकांड
आरोपींनी संपूर्ण हत्याकांड एक वेबसीरिज पाहून रचली. नेटफिल्क्सवरची HIT नावाची एक वेबसीरिज त्यांनी पाहिली. त्यानंतर आरोपींनी कारची नंबर प्लेटही बदलली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडीची नंबर प्लेट बदलली. 


ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात राहाणाऱ्या हॉटेल व्यावाी कृष्ण कुमार शर्मा यांचा 15 वर्षांचा मुलगा कुणालचं अपहरण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कुणालच्या शोधसाठी पोलिसांनी अनेक पथकं बनवली होती. तसंच अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. अपहरण आणि हत्येच्या चार दिवसांनंतर पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलं.