मुंबई : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्याच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकत्र आले आहेत. याप्रकरणी उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवाद हा देशाच्या सुरक्षेसाठी प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले. लष्कर ए तोयबाला दहशतवादी संघटना घोषित केल्याचे भारत स्वागत करत असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानात ज्या दहशतवादी संघटना मोठ्या होत आहेत त्याचा सामना केवळ भारतच नव्हे तर अमेरिकाही करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


9 ऑगस्टला लिलाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरार दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार आहेत. दाऊदविरोधात कठोर कारवाई करण्यावर अमेरिका सहमत झाली आहे. दाऊद इब्राहिमचे मुंबईतील भेंडी बाजारातील प्रॉ़पर्टीचा 9 ऑगस्टला लिलाव होणार आहे. दाऊदला शोधण्यासाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. त्याच्याविरोधात दोन्ही देश मिळून सर्च ऑपरेशन चालवणार आहेत.


25 लाख डॉलरच बक्षीस


मुंबई बॉम्ब हल्ल्यातील या मास्टरमाईंडच्या शोधात भारत अनेक वर्षांपासून  आहे. दाऊद हा भारताप्रमाणे अमेरिकेसाठीही मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलंय. अमेरिकेने त्याच्यावर 25 लाख डॉलरच बक्षीसंही लावलं आहे.