विराट की विलियमसन; आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?
आजच्या सामन्यात दोन्ही कर्णधारांच्या विजयाच्या शक्यता किती?
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप-2019 ची पहिली सेमीफायनल आज रंगणार आहे. दोन वेळा चॅम्पियन असलेला भारत आणि मागच्या वर्ल्डकपची उपविजेता टीम न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आजचा हा सामना होणार आहे. भारताचा या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये फक्त एकदाच पराभव झाला आहे. तर न्यूझीलंडला 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या दोन्ही संघामध्ये हा पहिलाच सामना रंगतो आहे. कारण मागचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
विराट कोहली : कोहलीने 76 वनडे सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं असून 56 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 18 सामन्य़ांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना ड्रॉ झाला असून. एक सामना अनिर्णित ठरला होता.
जिंकण्याची शक्यता - 73.68 टक्के
कोहलीने न्यूझीलंडच्या विरोधात 6 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. ज्यामध्ये त्याने 5 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडच्या विरोधात आजच्या सामन्यात विराटच्या विजयाची शक्यता 83.33 टक्के आहे.
केन विलियमसन : न्यूझीलंडच्या कर्णधार केन विलियमसनने 73 वनडे सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. ज्यापैकी त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड टीमचा 39 सामन्यांमध्ये विजय तर 32 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर २ सामने अर्निर्णित ठरले आहेत.
जिंकण्याची शक्यता : 53.42 टक्के
केन विलियमसनने कर्णधार म्हणून भारताच्या विरोधात 13 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. तर 9 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. आजच्या भारता विरोधात सामन्यात त्याच्या विजयाची शक्यता 30.77 टक्के आहे.
कोहलीची न्यूझीलंडच्या विरोधात कामगिरी
न्यूझीलंडच्या विरोधात वनडेत सर्वाधिक रन विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 22 सामन्यांमध्ये 1302 रन बनवले आहेत. ज्यामध्ये 5 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीनंतर सर्वाधिक रन धोनीच्या नावावर आहेत. त्याने 890 रन केले आहेत.
केन विलियमसनची भारताविरोधात कामगिरी
केन विलियमसनने भारताच्या विरोधात 23 सामन्यांमध्ये 895 रन केले आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 7 अर्धशतक आहेत. भारताविरोधात न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक 1117 रन केले आहेत.