भारत अमेरिकेला ‘या’ क्षेत्रात टाकणार मागे
दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला पाठी टाकण्याची शक्यता आहे.
मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला पाठी टाकण्याची शक्यता आहे.
मोबाईलवरुन होणारा इंटरनेटचा वापर अतिशय वेगाने वाढत आहे. २०१८ मध्ये जगभरातील ५२ देशांमधील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ६६ टक्क्यांहून जास्त असेल. सध्या हे प्रमाण ६३ टक्के आहे, असे झेनिथने अहवालात म्हटलय. २०१८ मध्ये भारतातील मोबाईल वापकर्त्यांची संख्या जवपास ५३ कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या एका एजन्सीने व्यक्त केलाय.
या यादीत चीन भारतापेक्षा पुढे आहे. २०१८ मध्येही चीन आघाडी कायम राखेल आणि तेथील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या १.३ अब्ज असेल, असा अंदाज वर्तवलाय. यामध्ये अमेरिका २९ कोटी मोबाईल वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असेल, अशी शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये इंटरनेटवरील जाहिरातींसाठी केला जाणाऱ्या एकूण खर्चापैकीची ५९ टक्के रक्कम मोबाईल इंटरनेटकडे वळवली जाईल, असा अंदाज आहे. तर पुढील वर्षभरात जगातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढेल असाही अंदाज आहे.
२०१८ मध्ये इंटरनेटवरील जाहिरातींसाठी केला जाणाऱ्या एकूण खर्चापैकीची ५९ टक्के रक्कम मोबाईल इंटरनेटसाठी खर्च केली जाईल. तर २०१९ मध्ये हे प्रमाण ६२ टक्क्यांवर जाईल, असेही एजन्सीने अहवालात म्हटलेय. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोबाईलसोबतच टॅबलेट वापरकर्त्यांची संख्यादेखील वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी टॅबलेट वापरकर्त्यांची संख्या १७.८ टक्के इतकी होती. यंदा ते प्रमाण १८.७ टक्क्यांवर पोहोचलेय.