भारत इस्त्राइलकडून 300 कोटीत खरेदी करणार स्पाइस बॉम्ब
भारत सरकार आता आपली सामरिक शक्ती मजबूत करत आहे.
नवी दिल्ली : भारत सरकार आता आपली सामरिक शक्ती मजबूत करत आहे. याच दिशेने भारताने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारत सरकार आता स्पाइस बॉम्ब खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी भारताने पुन्हा एकदा आपले मित्र राष्ट्र इस्त्रायलची मदत घेतली आहे. भारताने इस्त्रायलसोबत करार केला असून यानुसार 100 स्पाइस बॉम्ब खरेदी केले जाणार आहेत.
भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये स्पाइस बॉम्बचा वापर केला होता. तेव्हा याच बॉम्बच्या मदतीने एअरफोर्सने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले होते. शेजारी राष्ट्राच्या कुरापत्या तसेच दहशतवादाने डोकं वर काढल्यास अशाप्रकारचे हल्ले चढवण्याची गरज भारताला भविष्यातही लागू शकते. या पार्श्वभूमीवर भारताने इस्त्रायलसोबत 300 कोटींचा सुरक्षा करार केला आहे. याआधी आपली सामरिक शक्ती वाढवत भारताने आधुनिक पिस्टल खरेदीचा करार देखील केला आहे.
दक्षिण-पूर्व आशिया आणि आखाती देशांना भारत आता मिसाईल निर्यात करणार आहे. दोन्ही देशांच्या करारानंतर पहिली मिसाइल एक्सपोर्ट केली जाईल असे ब्रम्होस एरोस्पेसचे एचआर कोमोडर एसके अय्यर यांनी सांगितले. दक्षिण-पूर्व आशियातील देश आपली मिसाइल खरेदी करण्यास तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. हे आमची पहिली निर्यात असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.