नवी दिल्ली : भारतीय लष्कराने (Indian Army) देशातील सर्व नागरिकांना एक वेगळ्या अंदाजात प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day) शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कराने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारतीय लष्कराने आपल्या व्हिडिओमध्ये हा संदेश दिला आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कोणत्याही परिस्थितीत भारतीय लष्कर देशाच्या सेवेसाठी समर्पित असल्याचं, सदैव तत्पर सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कर देशाचे ध्येय, स्वप्न पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर आहे. भारतीय लष्कर हे केवळ देशसेवेसाठी रुजू असलेलं सैन्य नाही तर ती मूल्ये, परंपरा आणि संस्कारांनीही परिपूर्ण आहे. भारतीय लष्कर सीमेवर शत्रूशी दोन हात करते तर, कोणतीही आपत्ती आल्यास देशवासियांचं रक्षणही करते.



देश आज ७१वा प्रजासत्ताकदिन साजरा करतोय. नवी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. तर मुंबईत शिवाजी पार्क मैदानात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.