Indian Army Dog : भारतीय लष्कराचा बहादूर कुत्रा ZOOM? दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढला
Indian Army: भारतीय लष्कराचा शूर कुत्रा ZOOM याचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. कारण त्याने कामगिरीही तशीच केली आहे. दोन गोळ्या लागल्यानंतरही दहशतवाद्यांशी लढत दिली.
Indian Army: भारतीय लष्कराचा (Indian Army) शूर कुत्रा ZOOM याचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. कारण त्याने कामगिरीही तशीच केली आहे. दोन गोळ्या लागल्यानंतरही दहशतवाद्यांशी लढत दिली. अधिकार्यांनी सांगितले की 'झूम'ने दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्यादरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या. लष्कराच्या अनेक ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांशी लढतानाचा 'झूम'चा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
Indian Army Dog Zoom Injured: जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा शूर कुत्रा 'झूम' गंभीर जखमी झाला आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सोमवारी आपला प्रशिक्षित कुत्रा 'झूम' याला शोध मोहिमेसाठी सोबत घेतले. दहशतवादी लपलेल्या घराला घेरले आणि शोध मोहिमेसाठी पाठवले. मात्र, कारवाईदरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकार्यांनी सांगितले की, 'झूम'ने दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्या दरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या. लष्कराच्या अनेक ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांशी लढतानाचा 'झूम' व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये भारतील लष्कराने 'झूम'ला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला ZOOM कोण आहे, हे माहित आहे का?
लष्कराचा प्रशिक्षित कुत्रा 'झूम' ?
'झूम' हा उच्च प्रशिक्षित, क्रूर आणि वचनबद्ध कुत्रा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अधिकार्यांच्या मते, झूम दक्षिण काश्मीरमधील अनेक सक्रिय ऑपरेशन्सचा एक भाग आहे. सोमवारी दहशतवादी लपलेले घर शोधण्याचे काम नेहमीप्रमाणे झूमला देण्यात आले होते, परंतु त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. शूर सैनिक 'झूम'ने गंभीर जखमी होऊनही आपले काम सुरु ठेवले, परिणामी दोन दहशतवादी ठार झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'झूम'ला श्रीनगरमधील आर्मी व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे कुत्र्यावर उपचार सुरू आहेत. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, तर अनेक जवान जखमी झाले.