अवंतीपुरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक अजूनही सुरूच
अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे
नवी दिल्ली : भारतीय सेनेला आणि सुरक्षादलाला शनिवारी आणखी एक मोठं यश मिळालंय. सेनेनं दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरामद्ये मंगळवारी एका दहशतवाद्याला ठार केलंय. बराच वेळ सुरू असलेल्या एन्काऊंटरमध्ये सेनेनं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं.
अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे. एन्काऊंटर अद्यापही सुरू आहे.
भारतीय सेना, सीआरपीएस आणि स्थानिक पोलीस एकत्रितरित्या हे ऑपरेशन हाताळत आहेत.