मुंबई : भारतीय लष्कराच्या पैराट्रूपर्सला जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्सेस असल्याचे सांगितले जाते. ही फोर्स इतकी विशेष आहे की, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या फोर्सला जॉईन होण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाही. लेफ्टनंट कर्नल म्हणून टेरिटोरियल आर्मीशी संबंधित असलेला महेंद्रसिंग धोनी याच पॅरा फोर्सशी जोडलेला आहे. ही तिच स्पेशल फोर्स आहे, जिने 2016 ला उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केली. या फोर्सबद्दल सर्व काही जाणून घ्या.


फोर्सचं दुसऱ्या महायुद्धाशी कनेक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरा स्पेशल फोर्सेस पॅराशूट रेजिमेंटशी संबंधित आहेत. या युनिटचा संबंध दुसर्‍या महायुद्धाशी आहे. ऑक्टोबर 1941ला 50 पॅराशूट ब्रिगेडची स्थापना झाली. 9 पॅराला 1966 मध्ये तयार केले गेले आणि त्यामुळे याला 9 व्या पॅराशूट कमांडो बटालियन म्हणून ओळखले जाते. ही सैन्यातील सर्वात जुनी पॅरा युनिट आहे. सध्या सैन्यात पॅरा फोर्सच्या 9 बटालियन आहेत.


1 पॅरा (एसएफ)
2 पॅरा (एसएफ)
3 पॅरा (एसएफ)
4 पैरा (एसएफ)
9 पॅरा(एसएफ)
10 पॅरा (एसएफ)
11 पॅरा (एसएफ)
12 पॅरा (एसएफ)
21 पॅरा (एसएफ)


30,000 फुटांवरून मारावी लागते उडी


जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 साली लढाई झाली, तेव्हा उत्तर भारतातील इन्फंट्री युनिट्सचे सैनिक गार्ड्स ब्रिगेडच्या मेजर मेघ सिंग यांच्या नेतृत्वात पाठवले गेले. या गटाची कामगिरी पाहता, त्याची स्वतंत्रपणे स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर, एक विशेष बटालियन तयार केली गेली. परंतु पॅराट्रूपिंगला कमांडो रणनीतीचा अविभाज्य भाग ठेवण्यात आले. यानंतर त्याला पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रांसफर करण्यात आले.


जुलै 1996 मध्ये पॅराशूट रेजिमेंट देशातील पहिली स्पेशल ऑपरेशन युनिट बनली. 30 हजार फूट उंचीवरून उडी मारण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण पॅरा कमांडोना 15 दिवस दिली जाते.


प्रशिक्षण आग्राला होते


पॅरा कमांडो आग्रा येथील पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेतात. पाच वेळा यशस्वी रित्या उडी मारल्यानंतरच, कोणत्याही कमांडोला पॅराट्रूपर्सचा बॅच प्राप्त होतो. वेगवेगळ्या टप्प्यात प्रशिक्षण देऊन कमांडोना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करणे हे त्यामागचे उद्देश आहे.


पॅराशूट हे पॅरा कमांडोचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्याचे वजन सुमारे 15 किलोग्रॅम आहे, तर रिझर्व्ह पॅराशूटचे वजन 5 किलोग्रॅम आहे. या पॅराशूटची किंमत एक लाख ते दोन लाखांपर्यंत आहे. या कमांडोना रात्री झोप न येण्यापासून ते रिकामी पोट राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.


पॅरा कमांडोच्या जबाबदाऱ्या काय आहेत?


शत्रूबद्दलची छोट्यातली छोटी बातमी गोळा करणे आणि शत्रुची महत्त्वाचे ठिकाणे नष्ट करणे हे या फोर्सचे काम आहे. सन 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये या विशेष फोर्सचा समावेश होता. सध्या ही सैन्य तुकडी काश्मीरमधील असंख्य काउंटर-इनर्सेंजी ऑपरेशन्सचा एक भाग आहे. भारतीय सीमेवरील संकट पार पाडण्याची जबाबदारी या विशेष दलाचीही आहे.


सर्जिकल स्ट्राईकपूर्वी याच युनिटने 1971 मध्ये भारत-पाक युद्ध, 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार, 1980 मध्ये श्रीलंकेत ऑपरेशन पवन, 1988 मध्ये मालदीव ऑपरेशन कॅक्टस आणि नंतर 1999 मध्ये कारगिल युद्ध अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमा पार पाडल्या आहेत.