मुंबई : भारतीय लष्कर हे जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक मानले जाते. येथील सैनिकांच्या शौर्याच्या कहाण्या जगभर प्रसिद्ध आहेत. भारतीय सैन्यातील सैनिक शत्रूंवर रणांगणावर तुटून पडतात. त्यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. आपल्या सैन्यातील शूर जवानांनी भारतमातेचे मस्तक कधीही झुकू दिले नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, भारतीय सैन्याबाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशीच एक खास गोष्ट सांगणार आहोत, जिच्‍याबद्दल ऐकून तुम्‍ही हैराण व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला भारतीय लष्कराच्या वाहनांशी संबंधित एक खास गोष्ट सांगणार आहोत. देशातील वाहनांसाठी बनवलेले कायदे लष्कराच्या वाहनांना लागू होत नाहीत, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या वाहनांसाठी वेगळे कायदे केले आहेत. यासोबतच या वाहनांची संपूर्ण माहितीही संरक्षण मंत्रालयाकडे आहे.


लष्कराच्या वाहनांचा क्रमांक असा लिहिला जातो


भारतीय लष्कराच्या वाहनांच्या नंबर प्लेटवर बाणाचे चिन्ह असते हे तुम्ही पाहिलेच असेल. त्यानंतर बाकीचे आकडे लिहिले जातात. हा बाण वरच्या दिशेने बनवला आहे. एका अहवालानुसार, बाणाचे हे चिन्ह पहिले किंवा तिसऱ्या क्रमांकावर असू शकते. यानंतर, ज्या वर्षात लष्कराला ते वाहन मिळाले त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक लिहिलेले जाते. यानंतर बेसचा कोड लिहिला जातो आणि त्यानंतर यावर अनुक्रमांक दिला जातो.


नंबर प्लेटवर बाण लावण्याचा हा आहे विशेष अर्थ


लष्कराच्या वाहनांच्या नंबर प्लेटवरील बाणाच्या चिन्हाला ब्रॉड अॅरो म्हणतात. ब्रिटीश कॉमनवेल्थमध्ये आजही नंबर प्लेट्सवर अशा प्रकारचे बाणाचे चिन्ह वापरले जाते. या बाणाची खूण नंबर प्लेटवर लावली जाते जेणेकरून अपघातात वाहन उलटले झाले तरी त्या गाडीचा नंबर सहज वाचता येईल.