मुंबई : लोकप्रिय आणि नामांकित ज्योतिष बेजान दारूवाला यांचा शुक्रवारी निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एका रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे बेजान दारूवाला यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या मुलाने ही गोष्ट नाकारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, बेजान दारूवाला यांच्या मुलाने मात्र ही गोष्ट नाकारली आहे. बेजान दारूवाला यांचा मुलगा नास्तुर दारूवाला यांनी त्यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याच म्हटलं आहे. 



बेजान दारूवाला यांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. त्यांना अहमदाबादच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ११ जुलै १९३१ मध्ये गुजरातमध्ये एका पारसी कुटुंबात बेजान दारूवाला यांचा जन्म झाला. ते इंग्रजीचे अध्यापक होते. देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं राशीभविष्य प्रसारित होत असे. 



बेजान दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आपल्या वेबसाइटचा शुभारंभ केला. बेजान दारूवाला यांनी संजय गांधी यांच्या अपघाताची आणि २०१४ मधील पंतप्रधान मोदी यांची भविष्यवाणी केली होती.