भारतीय `कर्णा`चा दानशूरपणा, गरीब पाकिस्तानसाठी मदतीचा हात
त्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 62 बोअरवेल त्या ठिकाणी खणून घेतल्या.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे पारंपारीक शत्रू मानले जातात. सीमेवर असो किंवा खेळाच्या मैदानात जेव्हा विषय पाकिस्तानचा येतो तेव्हा लढाई ईर्षेची होते. पण एका भारतीयाच्या मोठ्या मनाचं खुद्द पाकिस्तानमध्ये तोंडभरून कौतूक होत आहे. या भारतीयाने असं काही केलंय की पाकिस्तानी नागरिक याचा ऋणी राहणे पसंत करत आहे. दुबईतील एका भारतीय व्यावसायिकाने पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व सिंध प्रांतातील अत्यंत गरीब भागात एक दोन नव्हे तर 63 बोअरवेल (हॅंडपंप) दान केल्या आहेत.
सलारिया हे 1993 पासून संयुक्त अरब अमीरात येथे राहत आहेत. ते परिवहन व्यवसायाशी संबंधित आहेत. ते फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्याशी संपर्क साधला आणि गरजूंना आर्थिक मदत केली.