An Indian Complained About Google Map This Is What He got The Response : आज इंटरनेट (Internet) आणि स्मार्ट फोनच्या जगात आपल्याला कोणत्याही गोष्टीची अडचण आली तरी काही मिनिटात त्यावर उपाय मिळतो. एवढंच काय तर चहाच्या टपरी पासून मॉलपर्यंत नवीन ठिकाणी देखील आपण आरामत फिरू शकतो. दरम्यान, हे सगळं सिद्ध आहे ते गूगल मॅपच्या (Google Maps) मदतीनं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google Maps मध्ये आपल्याला संपूर्ण नकाशा दिसतो. फक्त आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या जागेचे नाव माहित हवे. इतकंच काय तर त्यांनी Google वर सर्च करताना त्या जागेचे नाव नीट टाईप करता आले पाहिजे. त्यानंतर आपण ज्या जागी जायचे आहे तेथे आरामात आणि नीट जाऊ शकतो. मात्र, गूगल मॅपमध्ये एक गडबड आहे आणि ती म्हणजे आपल्याला खरंच फ्लायओव्हर वरून जायचे आहे की नाही हे अनेकदा कळत नाही. दरम्यान, आता ही गोष्ट एका भारतीय विनोदवीरनं गूगलच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर गूगल मॅपनं चक्क शायरीनं उत्तर दिले आहे आणि सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे. 



त्या विनोदवीरचे नाव कार्तिक अरोरा (Comadian Kartik Arora) असे आहे. कार्तिक अरोरानं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कार्तिक म्हणाला, 'गूगल, इतके चांगले मॅप बनवले, त्यात आणखी एक फिचर सुरु केलं असतं जेणेकरून फ्लायओव्हरवर चढण्याचे आहे की नाही यासाठी एक वेगळा सिग्नल दिला असता. 5 इंचाच्या स्क्रिनवर अर्ध्या मिलिमिटरची ही लहान गोष्ट कोणत्या माणसाला कशी दिसेल. तुमचा विश्वासू, 2 किलो मीटर पुढे जाणून यू टर्न घेणारी व्यक्ती.'  कार्तिक अरोराचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. इतकंच काय तर कार्तिकच्या या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केले आहे. कार्तिकनं हे ट्वीट 2019 साली केलं होतं. 


हेही वाचा : Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट



कार्तिक अरोराच्या या ट्वीटवर गूगल इंडियानं शायरी शेअर करत मजेशीर उत्तर दिलं आहे. "तुमच्या सारखे आमचे वापरकर्ते आहेत त्यांचे आभार,  जे आम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवतात. चांगलं करत राहण्याचे हे प्रयत्न कधीच थांबणार नाही, मेरे हमसफर." थोडक्यात गूगलनं हे ट्वीट करत त्यांच्या वापरकर्त्यांना एक वचन दिलं आहे की लवकरात लवकर हे नवीन फीचर येणार आहे. आता हे फीचर कधी येणार याची प्रतिक्षा गूगल वापरकऱ्यांना पडला आहे.