या दोन भावांच आयुष्य एक उत्तम उदाहरण
कायम आनंदी चेहरा असतो दोघांचा
मुंबई : ऑफिसमध्ये भरपूर काम असेल तर आपली चिडचिड होते. कधी घरी आवडीचं जेवण नाही मिळालं तर आपण नाराज होते. हवं त्यावेळी हवं त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही म्हणून आपण त्रागा करतो. आज फास्ट फॉरवर्ड लाइफमध्ये प्रत्येकजण परफेक्ट जीवनाचं स्वप्न बघत असतो. पण खूप कमी लोकं असतात जे काही तरी कमी असूनही कायम हसत असतात. भारतातील अशा दोन भावांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कोण आहेत हे?
छत्तीसगडमधील रायपुर शहरात राहणारे शिवनाथ आणि शिवराम साहू हे जुळे भाऊ एकमेकांना पोटापासून चिकटले आहेत. या दोघांच आयुष्य खूप कठिण आहे पण तरी देखील हे खूर खूष आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शारिरीक व्याधी असूनही हे दोघं आपल्या आयुष्यात कायम हसत असतात. अनेक संकटांना रोज सामोरे जात असूनही या दोघांनी आपल्या आयुष्याबाबत कधी तक्रार केली नाही.
काही लोकं मानतात दैवी अवतार
12 वर्षांचे शिवनाथ आणि शिवराम साहू शरिरात कंबरेपासून जोडले आहेत. यांची फुफ्फुस, हृदय आणि मेंदू वेगवेगळे आहेत. दोघांचे दोन पाय आणि चार हात आहेत. यामुळे रायपुर शहरातील या भावांना दैवी अवतार समजतात. एवढंच काय तर लोकं या दोघांची पूजा करत आहेत. पण जेव्हा त्यांच्या आजाराची माहिती कळली तेव्हा लोकांनी पूजा करणं बंद केलं.
या दोघांच्या पालकांना यांच्यावर अतिशय गर्व आहे. यांचे वडिल राजकुमार हे मजुरीचं काम करून कुटुंब चालवतात. घरात पाच मुली आणि 2 मुलगे देखील आहेत.
एकमेकांपासून नाही व्हायचं वेगळं 2 लाख जुळ्या मुलांमध्ये एक अशी घटना घडते जी शिवराम आणि शिवनाथसोबत झाली आहे. काही डॉक्टरांच म्हणणं आहे की, यांना वेगळं केल जाऊ शकतं. पण या दोघांनाच एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही. शिवराम याने सांगितलं की, आमची एकमेकांपासून वेगळी होण्याची इच्छा नाही.