पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर
![पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/03/14/278042-212621-pm-modi1.jpg?itok=YY0o8rzu)
यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताचा विकास दर ८ टक्क्यांवर नेण्यासाठी काही गोष्टींमध्ये सुधार करण्याची गरज आहे. त्यात क्रेडीट, गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्रातील प्रतिस्पर्धा वाढविण्याची गरज आहे. विकास दर वाढविण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अनुकूल वातावरण बनणे गरजेचे असणार आहे.