Britannia Treat Croissant: लोकप्रिय भारतीय कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. उमेदवारांना फक्त एक दिवसाची इंटर्नशिप करायचीय आहे आणि यासाठी त्यांना चक्क 3 लाखांचा पगार मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना फक्त ऑफिसच्या कानाकोपऱ्यात फिरावे लागणार आहे व तिथे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना फक्त एका शब्दाचा उच्चार नीट शिकवायचा आहे. ही ऑफर ब्रिटानिया ट्रीट क्रॉसां (Britannia Treat Croissant) कडून देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रिय फूड प्रोडक्ट कंपनी ब्रिटानियाकडून ही इंटर्नशिप ऑफर करण्यात आली आहे. Croissant pronunciation expert या नावाने ही ऑफर देण्यात आली आहे. या इंटर्नशिपसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराला एक दिवस ब्रिटानीयाच्या ऑफिसमध्ये घालवायचा असून तिथल्या कर्मचाऱ्यांना फ्रेंच पेस्ट्री Croissant चे नाव योग्य पद्धतीने उच्चारण्याचे शिकवायचे आहे. जर तुम्हालादेखील या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर कसा अर्ज कराल? याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 


कोण करु शकतं अर्ज?


एका वृत्त पत्रानुसार, जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकता. कोणीही यासाठी अल्पाय करु शकता. पेस्ट्रीची आवड असलेली लोकंही या पदासाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. 


कसं होणार रजिस्ट्रेशन?


सगळ्यात पहिले तुम्हाला ब्रिटानियाच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोप्पी आहे. Britannia. Croissant या इन्स्टाग्राम पेजवरील बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलला फॉलो करा. त्यानंतर कमेंटकरुन तुम्हाला ही इंटर्नशिप का हवीये? याचे कारण स्पष्ट करावे लागणार आहे. 


फक्त एक दिवसांची इंटर्नशिप


फक्त एक दिवसांची ही इंटर्नशिप असणार आहे आणि बक्षीस म्हणून तब्बल 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर तुम्हालादेखील ही सुवर्णसंधी सोडायची नाहीये तर तुम्ही या इंटर्नशिपसाठी अप्लाय करु शकता. 


कधीपर्यंत करू शकतो अर्ज?


तुम्हालादेखील या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करा. 10 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. 4 मार्च पासून यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.