Prabhakar Raghavan : जगातील सर्वात दिग्गज आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये भारतीय व्यक्तींचाच दबदबा आहे. गुगल ते मायक्रोफ्टसारख्या टॉप टेक कंपन्यांमध्ये सुंदर पिचाई, सत्य नडेला, शांतनु नारायणंन, नील मोहन, अरविंद कृष्णासह अनेक भारतीय टॉप पोझिशनवर आहेत. यामध्ये आणखी एका भारतीय नावाचा उल्लेख आहे ते म्हणजे प्रभाकर राघवन. गुगलने काही दिवसांपूर्वी प्रभाकर राघवन यांना चीफ टेक्नॉलॉजिस्ट हे पद दिलं आहे. आतापर्यंत ते गुगलमध्ये सीनियर वाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होते. या पदावर असताना गुगल सर्च, असिस्टेंट, जाहिरात आणि पेमेंट प्रोडक्टस या विभागाचे काम पाहायचे. 


आयआयटी मद्रासमधून बीटेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळमध्ये जन्मलेले आणि तेथेच लहानाचे मोठे झालेले प्रभाकर राघवन यांचे शालेय शिक्षण कॅम्पियन स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी 1981 मध्ये IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी मिळवली. राघवन यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात सल्लागार प्राध्यापकही राहिले आहेत.


राघवन याहू लॅबचे संस्थापक


प्रभाकर राघवन हे Yahoo Labs चे संस्थापक होते. त्यांनी अनेक वर्षे त्याचे नेतृत्व केले. या काळात तो शोध, जाहिरात रँकिंग आणि मार्केटप्लेस डिझाइनसाठी जबाबदार होता. पुढे त्यांनी या कंपनीत मुख्य सचिव अधिकारी म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी 14 वर्षे IBM मध्येही काम केले.


गुगल देतंय इतका पगार 


प्रभाकर राघवन यांना गुगलमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी गुगल सुमारे 300 कोटी रुपये वार्षिक वेतन देत होते. मात्र, चीफ टेक्नॉलॉजिस्ट पदासाठी त्यांना किती पगार मिळेल, याची माहिती नाही.


अल्गोरिदम आणि डेटाबेसवर संशोधन


प्रभाकर राघवन हे जागतिक दर्जाचे संगणक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याला अल्गोरिदम, वेब शोध आणि डेटाबेसवर 20 वर्षांपेक्षा जास्त संशोधनाचा अनुभव आहे. त्यांचे 100 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याच्या नावावर 20 हून अधिक टेक आणि वेब पेटंट्स आहेत.