Flight rules change : विमानप्रवास करण्याची सुरुवातच मुळात नियमांपासून होते. विमानाच्या तिकीटापासून त्यात न्यायच्या सामानापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये नियम आणि अटी लागू असतात. याच नियमांमध्ये आता एका नव्या नियमाची भर पडली असून हा नियम अनेकांच्याच फायद्याचाही ठरणार आहे. कारण, इथून पुढं विमानात प्रवास करताना तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद ठेवानं लागणार नाही. अर्थात फोन Airplane Mode वर ठेवावा लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानातून प्रवास करताना कायमच मोबाइल फ्लाइट मोडवर ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. आता मात्र तसं होणार नसून, या प्रवासादरम्यान तुम्हाला मनसोक्त इंटरनेट सर्फिंग करता येणार आहे. थोडक्यात विमानात  WiFi सुविधेसह इंटरनेट कनेक्टिव्हीटी दिली जाणार आहे. सरकारकडून यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 


केंद्रीय दूरसंचार विभागानुसार, हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना WiFi द्वारे प्रवाशांना इंटरनेट मिळू शकणार आहे. अट फक्त एकच, विमान हवेत झेपावल्यानंतर त्यानं 3,000 मीटर इतकी उंची गाठल्यानंतरच WiFi सुरू केलं जाणार असून, प्रवासी मोबाईल इंटरनेट सेवा वापरू शकतील. विमान ठराविक उंचीवर गेल्यानंतर तिथं इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्यानं जमिनीवरील सेवांवर त्यांचा कोणताही परिणामही होणार नाही. 


हेसुद्धा पाहा : विमानात नारळ का नेऊ देत नाहीत?


 


 Flight and Maritime Connectivity (Amendment) Rules, 2024 च्या अधिसूचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्रात किमान उंची गाठल्यानंतरच विमानात WiFi द्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. इतकंच नव्हे, तर विमानात विद्युत उपकरणं वापरण्यावरही बंदी घालण्यात येणार नाही. वैमानिकाकडे या सुविधांचं नियंत्रण राहणार असून गरजेनुसार ही सेवा सुरु आणि बंद करण्याचे अधिकारही त्यांच्याकडे असतील.