Center Seek Ban On These Dogs : गेल्या काही काळात परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने (Indian Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परदेशी ब्रिड्सच्या 23 श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल (Pitbull), रॉटविलर (Rottweiler), टेरियर, वूल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरात या ब्रिडचे कुत्रे ठेवले जातात. पण आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच या जातीच्या श्वानांच्या प्रजनानावर बंदी घालण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या जातीच्या श्वानांना परवाने दिले जाणार नाहीत, असे पशुसंवर्धन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या जातीच्या श्वानांचा वापर युद्धात केला जातो. त्यामुळे अशा श्वानांना घरी ठेवणं धोकादायक ठरु शकतं, असं केंद्र सरकारने म्हटलंय. पशुसंवर्धन मंत्रालयाचे सचिव डॉ. ओपी चौधरी यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलत पिटबूल आणि माणसाला धोकादायक ठरु शकतील अशा श्वानांच्या (Dogs) पालनास परवाना न देण्याच्या सूचना केल्या आहेत. 


या परदेशी श्वानांवर बंदी
पिटबुल टेरियर, तोसा इनु, अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर, फिला ब्रासीलिरियो, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोएसबोएल, कनगाल, सेंट्रल एशियन शेफर्ड, काकेशियन शेफर्ड, साउथ रशियन शेफर्ड, टोनजॅक, सरप्लानिनॅक, जापानी तोसा ऐंड अकिता, मास्टिफ्स, रॉटलवियर, टेरियर, रोडेशियन रिजबॅक, वोल्फ डॉग्स, कनारियो, अकबाश, मॉस्को गार्ड, केन कार्सो


या देशांमध्ये बंदी
जगातील अनेक देशांमध्ये पिटबुल डॉग पाळण्यास बंदी आहे. यात इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया इ. याशिवाय बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये पिटबुलचं संगोपन, व्यापार, प्रजनन यावर बंधने घालण्यात आली आहेत. 


पिटबूलच्या हल्ल्यात मृत्यू
लखनऊमध्ये (Lucknow) पिटबूल (Pitbull) जातीच्या कुत्र्याने आपल्याच मालकीणीवर हल्ला केला होता. यात 80 वर्षांच्या मालकिणीचा मृत्यू झाला होता. तर गाझियाबादमध्ये एका अकरा वर्षाच्या मुलावर पिटबूलने हल्ला केला. यात मुलाच्या चेहऱ्यावर तब्बल 150 टाके घालण्यात आले होते.  गाझियाबादमध्येच लिफ्टमध्ये एका पाळिव कुत्र्याने चिमुरड्याचा चावा घेतला होता. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर कुत्र्याच्या मालकिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.