नवी दिल्ली: शून्य मिनिटांत झाला १८ कोटी रूपयांचा मालक हे शिर्षक वाचून अनेकांची उत्सुकता नक्कीच ताणली गेली असेल. पण, खरोखरच असे घडले आहे. दुबईमध्ये राहणारा एक भारतीय व्यक्ती खरोखरच १८ कोटींचा मालक झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल १८ कोटींचा मालक होण्यासाठी त्याला काहीही कष्ट घ्यावे लागले नाहीत. केवळ नशीब म्हणूनच तो इतक्या प्रचंड रकमेचा मालक झाला आहे.


कष्टाने नव्हे नशिबाने जिंकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डिकसन कट्टीठारा अब्राहम हा व्यक्ती नायजेरियात राहतो. त्याने अबू धाबी येथील बिग तिकीट नावाने प्रसिद्ध असलेल्या लॉटरी सेंटरमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. विशेष म्हणजे अब्राहमचे नशीब इतके बलवत्तर की त्याने ही लॉटरी जिंकली. आबू धाबीच्या आंततराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी सकाळी १ कोटी दिनार म्हणजेच भारतीय रूपयांत तब्बल २२ लाक २५ हजार रूपये इतक्या रकमेची लॉटरी अब्राहमने जिंकल्याची घोषणा करण्यात आली. अब्राहमसोबतच इतर ९ लोकांनाही अशा प्रकारे लॉटरी जिंकली आहे. यात ५ भारतीय, ३ पाकिस्तानी आणि एक यूएईचा नागरिक आहे.


प्रदीर्घ काळापासून चालत आलेला प्राईज ड्रॉ


बिग तिकीट आबू धाबी हे लॉटरी सेंटर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रदीर्घ काळापासून चालत आलेला प्राईज ड्रॉ आहे. दरम्यान, या पूर्वी दुबईत राहणाऱ्या एका भारतीय ड्राईव्हने १ कोटी २० लाख दिनारची लॉटरी जिंकली होती.