600 Million Year Old Ocean In Himalayas: मागील काही दशकांपासून जगभरातील महासागरांसंदर्भात बरीच रंकज माहिती वैज्ञानिकांना मिळाली आहे. संशोधन, प्रयोग आणि पुरव्यांच्या आधारे सध्या अस्तित्वात असलेले आणि नामशेष झालेल्या महासागरांबद्दलची रंकज माहिती वैज्ञानिक, संशोधक वेळोवेळी जगासमोर आणत असतात. असाच एक शोध नुकताच समोर आला आहे. भारताच्या ईशान्येला असलेल्या हिमलयाच्या पर्वत रांगांमधील एका नामशेष झालेल्या महासागराचा शोध वैज्ञानिकांना लागला आहे. हा समुद्र जवळजवळ 60 हजार कोटी वर्षांपूर्वीचा असू शकतो असं सांगण्यात आलं आहे. या समुद्राचा शोध इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जपानच्या निगाता विद्यापीठाच्या संशोधकांनी लावला आहे.


पृथ्वीवर बर्फाची चादर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संशोधनासंदर्भात आयआयएससीने एक माहितीपत्रक जारी केलं आहे. हिमालयामध्ये मिळालेल्या तत्वांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचं अंश सापडले आहेत. यामुळे वैज्ञानिकांना पृथ्वीची जडणघडण होताना ऑक्सिजेनेशन कशापद्धतीने झालं हे समजून घेण्यास मदत होणार आहे. प्रिकॅम्बेरियन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये आयआयएससीच्या सेंटर फऑर अर्थ सायन्सेसमधील पीएचडीचे विद्यार्थी आणि या संशोधनाचे मुख्य लेखक प्रकाश चंद्रा आर्या यांनी, "आम्ही पॉलिओ ओशन्ससाठी एक टाइम कॅप्सूल शोधली आहे," असं सांगितलं. 50 ते 70 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जमीनीवर बर्फाची एक जाड चादर परसरली होती, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यानंतर पृथ्वीवरील ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने ऑक्सिजनेशनची प्रक्रिया सुरु झाली.


आधीचे समुद्र कसे होते याची माहिती नाही


आयआयएससीने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा निगडीत आहेत याबद्दलची माहिती अद्याप वैज्ञानिकांना देण्यात आलेली नाही. या दोन्ही घटनांचा संबंध लावण्यात अडचणी येण्यामागील दोन मुख्य कारणं म्हणजे, जीवाश्मांचा आभाव आणि पृथ्वीरील मोठ्या आकाराचे समुद्र नामशेष होणे. मात्र आता समोर आलेल्या माहितीमुळे हे समुद्र नेमके नामशेष कसे झाले याची माहिती मिळू शकते. "आपल्याकडे प्राचीन काळातील समुद्रांबद्दल फारशी माहिती नाही. सध्याच्या समुद्रांपेक्षा हे समुद्र किती वेगळे किंवा सारखे होते याचा आपल्याला काहीच अंदाज बांधता येत नाही. मात्र ही माहिती मिळाली तर पूर्वी पृथ्वीवर वातावरण कसं होतं याचा अंदाज बांधता येईल. याचा उपयोग क्लायमेट मॉडलिंगसाठी करता येईल," असं या संशोधनामध्ये म्हटलं आहे.


समुद्रांचा रंग बदलला


मागील 2 दशांमध्ये पृथ्वीवरील 56 टक्के समुद्रांमध्ये मोठे बदल घडले आहेत. वातावरण बदलामुळे हे बदल होत आहेत. समुद्राच्या पाण्याचा रंग समुद्रात कोणते जीवाश्म आहेत याचे संकेत देतो. विश्ववृत्ताजवळ मागील काही दशकांमध्ये समुद्राचं पाणी अधिक हिरवं झालं आहे. यावरुन समुद्रातील जीवसृष्टीमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचं स्पष्ट होतं आहे, असं सांगितलं जातं.