Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. मुलींना लग्न झाल्यावर त्यांच्या वडिलांच्या प्रोपर्टीवर अधिकार असतो की नाही यावरही काही प्रमाणात संम्रभ आणि गैरसमज आहेत. त्यातून आपल्या भारतीय संसदेनं आपल्याला कायदे आखून दिलेले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 आणि हिंदू उत्तराधिकार कायदा 1956. या कायद्यांनुसार (Indian Law) मुलींना आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर कसा आणि किती अधिकार आहे हे जाणून घेता येईल. कायद्याप्रमाणे मुलींना आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर कधी, कुठे आणि कसा अधिकार मिळतो यावर आपण जाणून घेऊया या लेखातून. (indian married daughters property rights what are rights daughters have on her fathers property what the law says)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी एक महत्त्वपुर्ण माहिती समोर येते की जर वडिलांनी कोणतेही मृत्यूपत्र (will) लिहून ठेवले नसेल तर त्यांच्या मुला - मुलींना त्यांच्या प्रोपर्टीवर समान अधिकार असतो परंतु जर वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात कोणाला दुसऱ्याला नमूद करून प्रोपर्टीचा अधिकार देण्याचे ठरवले असले तर मात्र मुलींना तसेच मुलांना त्यांच्या वडिलांचा समान अधिकार मिळत नाही. प्रथम आपल्या मालमत्तेबद्दल संपूर्ण निर्णय घेण्यास संपत्ती स्वत:च्या बळावर कमावणाऱ्या व्यक्तीला अधिकार असतो. त्यामुळे आपली संपत्ती कोणाला द्यायची याबद्दलही निर्णय घेण्याचा त्या व्यक्तीला पुर्ण अधिकार आहे. त्याचसोबत आपली प्रोपर्टीही आपल्या मुलांपैंकी कोणाला द्यायची हे ठरवण्याचेही अधिकार स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असते पण यातही मुलींना त्यांच्या वडिलांच्या प्रोपर्टीवर (Property) समान अधिकार आहे. त्याबद्दल त्या दावा करू शकतात. 


हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 काय सांगतो? 


हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या 1956च्या अधिनियमानुसार मुलगा आणि मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकर मिळतो. विवाहित मुलीलाही वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार असतो तर लग्न झालेल्या मुलींनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार आहे. त्याचा दावा त्याही करू शकतात. वारसा हक्कानं वडिलांना मिळालेली संपत्ती काही प्रमाणात मुलीला मिळते त्याचबरोबर वडिलांची संपत्ती स्वकष्टानं मिळवलेली असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं असले तर मुलीला त्यांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो.


 


वडिलोपार्जित मालमत्ता कायदा काय सांगतो? 


वडिलोपार्जित किंवा वारसा हक्कानं आलेल्या संपत्तीत मुलींचे अधिकार काहीसे कमी होतात. लग्न करून एखादी मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाते परंतु हिंदू उत्तराधिकार कायदा 2005 नुसार वडिलोपार्डित मालमत्ता कायद्यात मुलींना अधिकार आहेत. 


कोणत्या परिस्थितीत मुलींना अधिकार नाहीत? 


जर मुलीनं स्वत:हून वारसा हक्काचा त्याग केला असेल तर तिला मालमत्तेत अधिकार मिळत नाहीत. रिलिज डीडवर जर तिची सही असेल आणि कागदपत्रे सबमिट झाले असतील तर त्यांना अधिकार मिळत नाहीत. जर वडिलांनी आपणहून मुलींचा आणि मुलांचा अधिकार नाकारला असेल तर त्यांना अधिकार मिळत नाहीत.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया कायदेतज्ञांचा सल्ला घ्या.)