Army Dogs: लष्करामध्ये श्वानांची महत्त्वाची भूमिका असते. किंबहुना लष्कराती श्वान समोर आला, की अनेकांचाच थरकाप उडतो. त्याची नजर, त्याची शरीरयष्टी सर्वकाही लक्षवेधी. तुम्हाला माहितीये का, लष्करात श्वानाची निवड करण्यासाठीही निर्धारित प्रक्रिया असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करामध्ये श्वानांची विविध पथकं आहेत. यामध्ये लॅब्रडोअर, जर्मन शेपर्ड, बेल्जियम मालिंस आणि ग्रेट माऊंटन स्विस डॉग यांचा समावेश असतो. 2019 मध्ये संसदेत केलेल्या एका वक्तव्यामध्ये रक्षा राज्य मंत्र्यांनी यासंदर्भातीली माहिती देत लष्करामध्ये 25 पूर्ण श्वान पथकं आणि 2 अर्ध श्वानपथकं असल्याचं सांगितलं. एका पूर्ण पथकामध्ये 24 श्वान असतात आणि अर्ध पथकामध्ये 12. 


काय असतं काम? 
लष्करातील श्वान विविध प्रकारची कामं करतात. यामध्ये गार्ड ड्यूटी, पेट्रोलिंग, इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइसेस (आईईडी) यासह स्फोटकं शोधणं, माईन शोधणं, ड्रग्जसह प्रतिबंधित वस्तू शोधणं, संशयित लक्ष्यावर हल्ला करणं, दहशतवाद्यांचा मागोवा घेणं या कामांचा समावेश असतो. 


प्रत्येक श्वानासोबत हँडलर 
लष्करातील प्रत्येक श्वानासोबत एक डॉग हँडलर असतो. त्याच्या देखभालीसाठी या व्यक्तीची मोठी भूमिका असते. 


कुठे मिळतं प्रशिक्षण? 
लष्करातील श्वानांना मेरठमधील रिमाउंट अँड वेटरनरी कोर सेंटर अँड स्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. 1960 मध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरु झालं होतं. श्वानांच्या प्रजाती आणि त्यांच्या योग्यतेनुसार इथं प्रशिक्षण दिलं जातं. 


किती पगार मिळतो? 
तुम्हाला माहितीये का? श्वानांना लष्करात रँक मिळतो. पण, पगार मात्र मिळत नाही. त्यांच्या डाएटची अर्थात खाण्यापिण्याच्या सवयींची मात्र येथे पूर्ण काळजी घेतली जाते. ज्याव डॉग हँडलर नजर ठेवून असतात. या डॉग हँडलरना मात्र सैन्यात चांगल्या पगाराची नोकरी असते.