Government Jobs ची बरसात; 10 वी उत्तीर्ण आहात? नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी
पाहा फायद्याची बातमी
Government Jobs : स्टार्टअप आणि व्यवसायप्रेमी अशा सध्याच्या युगात सरकारी नोकरीच्या शोधात असणारेही कमी नाहीत. सरकारी नोकरीमध्येही काहीजणांचा कल हा देशाच्या संरक्षण व्यवस्थेत असणाऱ्या विभागात काम करण्याकडे दिसून येतो. अशाच मंडळींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. (indian navy and government job recruitment)
भारतीय नौदलात अग्निवीर (एमआर) या पदासाठी भरती निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. नौदलातील अग्निवीर (एसएसआर)ची भरती प्रक्रीया संपन्न झाल्यानंतर आता अग्निवीर एमआर भरती अर्ज मागवण्यात आले आहेत.
10 वी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. दहावीच्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवरून ही निवडप्रक्रिया होणार आहे. एकूण 240 जागांसाठी ही भरती होणार आहे, यापैकी 40 पदं महिलांसाठी आरक्षित आहेत.
या नोकरीसाठी पात्रता आणि अटी काय?
वयोमर्यादा - अर्जदाराचा जन्म 1 डिसेंबर 1999 ते 31 मे 2005 दरम्यान झालेला असावा. सरकारमान्य शाळेतून १० वी उत्तीर्ण असावं.
अर्जदारासाठी महत्वाची अट अशी आहे की, केवळ अविवाहीत पुरुष आणि अविवाहीत महिला या पदासाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 30 जुलै. आणि अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे joinindiannavy.gov.in