FD interest rate | `या` बँकेच्या ग्राहकांना तगडा झटका; FD च्या व्याजदरात मोठी कपात
सार्वजनिक क्षेत्रातील `या` बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : Indian Overseas Bank: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. हे नवे दर आजपासून म्हणजेच 11 एप्रिलपासून लागू झाले आहेत. नवीनतम दर जाणून घेऊया.
नवीन व्याजदर
- 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर झालेल्या ठेवींवर या आधी 3.40 टक्के व्याजदर मिळायचा, जो आता फक्त 3 टक्के मिळेल.
यापूर्वी 46 ते 90 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर 3.90 टक्के होता, मात्र आता 3.50. टक्के होईल.
- आधी 91 ते 179 दिवसांत मॅच्युअर ठेवींवर 4.4 टक्के व्याज मिळायचे, जे आता 4 टक्के झाले आहे.
- 180 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 4.90 टक्के होता, परंतु आता तो 4.5 टक्के असेल.
- बँकेने 1 वर्षापासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यावर 5.15 टक्के व्याजदर असेल.
- 2 वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.2 टक्के आणि 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर जैसे थे ठेवण्यात आला आहे.
- बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5 टक्के आणि 80 वर्षे आणि त्यावरील वृद्ध नागरीकांसाठी 0.75 टक्के अतिरिक्त व्याजदर कायम ठेवला आहे.
PNB ग्राहकांना धक्का
पीएनबीने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करून म्हटले आहे की, 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याज दर वार्षिक 2.70 टक्के करण्यात आला आहे.
या निर्णयानंतर 10 लाख रुपयांच्या मर्यादेत येणाऱ्या ग्राहकांना थेट फटका बसणार आहे. पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे.