मुंबई : भारतीय रेल्वेबद्दल बोलायचे तर गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने खूप प्रगती केली आहे. अगदी कमी वेळेत आणि कमी पैशात आपल्या प्रवास करण्याची सुविधा रेल्वेकडून मिळत आहे. ज्यामुळे अगदी गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे देखील प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. त्यामुळे रेल्वेकडून प्रवाशांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. प्रवाशांच्या सुविधांपासून ते रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेल्वेने बरीच सुधारणा केलेली पाहायला मिळत आहे. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातून चर्चेत आले आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हालाही ब्रिटीशकालीन नियम आठवायला लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर हे प्रकरण हापूरचे आहे. येथे काही नियम ब्रिटीश काळापासून चालत आले आहेत.


अलीकडेच हापूर विभागात तैनात असलेले गेटमन आपल्या कारमध्ये ड्युटीवर आले आणि त्यांनी आपली गाडी रेल्वे स्थानकाजवळ उभी केली. मात्र रेल्वेचे वरिष्ठ अभियंता तपासणीसाठी आले असता गाडी उभी असल्याचे पाहून त्यांनी गेटमनला नोटीस बजावली.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कारने ड्युटीवर येणे रेल्वे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. हो हे खरं आहे.


मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये अनेक चांगले बदल दिसून आले आहेत. पण काही नियमांबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला ब्रिटीशांचा काळ आठवू लागेल. गेटमनचे ड्युटीवर गाडीने येणे हे रेल्वे प्रशासन कायदा १९६८ चे उल्लंघन आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. हापूरचे हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.


शिपाई, खलासी, गेटमन, ट्रॅकमन या कर्मचाऱ्यांना गाडीने ड्युटीवर येण्याची परवानगी नाही. वास्तविक हे सर्व कर्मचारी गट ड अंतर्गत येतात. गेटमनने त्याची कार क्रॉसिंगवर उभी केली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर गेटमनला नोटीस बजावण्यात आली.