मुंबई : कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे सेवाही बंद आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आयआरसीटीसीकडून चालविल्या जाणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयआरसीटीसीने या गाड्यांचे रेल्वे आरक्षण ३० एप्रिलपर्यंत रद्द केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 IRCTCने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. या गाड्यांची तिकिटे आरक्षित केलेल्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचे आरआरसीटीसीने सांगितलं आहे.



कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आलेले आहेत. मात्र देशतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. हे पाहता  आयआरसीटीसीने आपल्या खासगी रेल्वेचे बुकिंग ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमुळे या तिन्ही रेल्वेंचे २५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंतचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले होते. मात्र आयआरसीटीसीकडून आता ३० एप्रिलपर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.