Indian Railway Ayodhya, Bodhgaya, Varanasi Package: पर्वत, डोंगर, निसर्ग.... या आणि अशा अनेक गोष्टी दाखवणाऱ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर बऱ्याचजणांचा कल असतो तो काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा. तिथं असणारी सकारात्मकता आणि भक्तिमय वातावरणामध्ये भान हरपून एका अदृश्य शक्तीशी एकरुप होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही येत्या काळात अशाच काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, थेट अयोध्या गाठायचीये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारत (North India) फिरण्यासाठी किंबहुना इथं असणाऱ्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. बरीच मंडळी इथं आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि त्याहूनही आपल्या आईवडिलांसमवेत येतात किंवा इथं येण्याची इच्छा व्यक्त करतात. अशा सर्वांसाठीच आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीकडून कमाल बेत आखण्यात आले आहेत. ज्यामाध्यमातून बोधगया, वाराणासी, अलाहबाद आणि अयोध्येत जाण्याची संधी मिळेल. 


IRCTC च्या या पॅकेजचं नाव आहे CHENNAI-GAYA-VARANASI-ALLAHABAD-AYODHYA-CHENNAI-THAI AMAVASAI SPECIAL (SMA38). उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठीच्या सहलीची सुरुवात 9 मार्चपासून होणार असून चेन्नईपासून ही भ्रमंती सुरु होईल. 6 दिवस आणि 7 रात्रींसाठी असणाऱ्या या पॅकेजमध्ये विमान प्रवास समाविष्ट आहे. या संपूर्ण सहलीमध्ये तुम्हाला स्टँडर्ड हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल. 


हेसुद्धा वाचा : कोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये? 


स्थानिक ठिकाणांना भेट देण्यासाठी एसी कारची सोय असून, 6 ब्रेकफास्ट आणि 6 डिनर अर्थात रात्रीचं जेवण पॅकेजमध्ये समाविष्ट असून टूर मॅनेजरची सुविधाही यामध्ये उपलब्ध असेल. 


माणसी किती खर्च येणार? 


तुम्ही एकटे या प्रवासासाठी निघणार असाल तर 49,000 रुपये इतका खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. तर, दोन व्यक्ती प्रवास करणार असल्यास ही रक्कम माणसी 39,000 रुपये आणि तीन व्यक्ती प्रवास करत असल्यास ही रक्कम 37,500 रुपये माणसी इतकी असेल. 5 ते 11 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र बेड घेतल्यास त्यांना 34,500 रुपये आणि 2 ते 4 वर्षे वय असणाऱ्यांना बेड न घेतल्यास 26,500 रुपये इतका खर्च येईल. तुम्हीही आईवडिलांना अयोध्यानगरी किंवा वाराणासी दाखवण्याचा विचार करताय का? IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला यासंदर्भातील सविस्कर माहिती मिळेल.