Travel News : प्रवासाची आवड असणारी मंडळी कामातून सवड काढत कायमच भटकंतीला जाताना दिसतात. या मंडळंच्या प्रवासाच्या यादीत कैक ठिकाणं आणि त्या ठिकाणांवर आयोजित केले जाणारे महोत्सव किंवा तत्सम कार्यक्रमांचीही नोंद असते. फक्त भारतातील नव्हे, तर संपूर्ण जगातील फिरस्त्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरणाऱ्या अशाच एका अनोख्या आणि चौकटीबाहेरच्या महोत्सवाला अर्थात फेस्टीव्हलला जाण्याची संधी तुम्हासा IRCTC देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेच्या अख्तयारित येणाऱ्या आयआरसीटीसीकडून 'हॉर्नबिल फेस्टीव्हल एक्स्ट्रावान्झा' हे पॅकेज नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. साचेबद्ध आणि गर्दीच्या पर्यटनस्थळांना भेट देऊन आणि एकाच पद्धतीचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल, तर अशा मंडळींसाठी ही सुवर्णसंधी. महोत्सवांचाही महोत्सव अशी ओळख असणाऱ्या या हॉर्नबिल फेस्टीव्हलमध्ये भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये असणाऱ्या नागालँड येथील नागा या आदिवासी जमातीची अनोखी आणि अतिशय रंजक जीवनशैली अगदी जवळून अनुभवण्याची संधी मिळते. 


IRCTC च्या वतीनं याच अनोख्या अनुभवासाठी टूर पॅकेजची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये दिमापूर, कोहिमा, खोनोमा गाव या ठिकाणांना भेट देण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तीन रात्री आणि 4 दिवस असा बेत असणाऱ्या या टूरच्या तारखा खालीलप्रमाणे...
30-11-2024
01-12-2024 
02-12-2024
03-12-2024
04-12-2024
05-12-2024 
06-12-2024 
07-12-2024 
08-12-2024


हेसुद्धा  वाचा : 'सवत नाही होणार', म्हणत प्रेमाच्या माणसाशी लग्न न करता अभिनेत्री राहिली अविवाहित; आज जगतेय 'असं' आयुष्य 


आयारसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये 4 ते 5 जणांच्या गटानं जायचा बेत असल्यास 5 ते 11 वर्षे वयोगटातील लहान मुलासाठी 16050 रुपये इतका खर्च येणार आहे. या टूर पॅकेजविषयी सविस्तर माहितीसाठी 'इथं' क्लिक करा.