Indian Railway: भारतात अशा ट्रेन आहेत ज्यांची ख्याती खूप मोठी आहे. जगातही अशा अनेक ट्रेन्स आहेत ज्या फास्ट अन् सुपरफास्टच्याही पुढे आहेत. त्यातील एक लोकप्रिय ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेन (Bullet Train). बुलेट ट्रेन ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल आपण अनेकदा रिसर्च केलं (Indian Railway Interesting Facts) असेलच. पण भारतातही अशा ट्रेन्स आहेत ज्या फास्ट काय तर नॉन स्टॉप सुपरफास्ट आहेत. त्यातील अशी एक ट्रेन आहे जिच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला माहितीये का की ही ट्रेन नक्की आहे तरी कोणती? कदाचित तुम्हाला केसही करता येणार नाही. हो, तुम्ही गेस केलं असेल तर तुमचा अंदाज योग्य आहे. या ट्रेनचे नाव आहे, निजामुद्दीन-त्रिवेंद्रम (केरळ) राजधानी एक्स्प्रेस (nizamuddin trivandrum rajdhani express), ही ट्रेन किती वेगाने धावते तुम्हाला माहितीये का? (Indian Railway nizamuddin trivandrum rajdhani express runs fast 528 km know more about this train)


मार्ग कुठला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला भारतीय रेल्वेबद्दल किती माहितीये, नसेल माहिती तर तुम्ही जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. निजामुद्दीन-त्रिवेंद्रम (केरळ) राजधानी एक्स्प्रेस ही ट्रेन राजस्थानमधील कोटा ते गुजरातमधील वडोदरापर्यंत नॉनस्टॉप प्रवास करते. ही गाडी न थांबता अगदी 528 किलोमीटरचा प्रवास सहज करते. हा प्रवास 6.30 तासात पुर्ण करते. या ट्रेनं शताब्दी एक्सप्रेसलाही मागे टाकले आहे. 


जाणून घ्या 'या' ट्रेनबद्दल! 


समोर आलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन एकूण 2845 किलोमीटरचा प्रवास करते वर्षातून. 1993 ही ट्रेन सुरू झाली. ही ट्रेन रविवार, मंगळवार आणि बुधवारी दिल्लीहून तर केरळमधून मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवार निघते. दिल्लीहून ही ट्रेन हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या मार्गे जाते. या ट्रेनला 12 डबे आहेत. 


भारतीय रेल्वेबद्दल जाणून घेऊ तेवढं कमी आहे. भारतीय रेल्वेंचा इतिहासही आपल्याला चकित करणारा आहे. पुर्वी ट्रेन पाहिली की लोकं ही घाबरायची परंतु आता मात्र ट्रेनला लटकत प्रवास करत जीव वाचवतही लोकं आपल्याला घरी सुखरूप पोहचतात. त्याचसोबतच मुंबईची लोकल ट्रेनही फार लोकप्रिय ठरली. अल्पावधीतच ती मुंबईची लाईफलाईन झाली. ट्रेनचा इतिहास हा वाचवा तेवढा कमी आहे परंतु त्याचबरोबर या ट्रेन्सबद्दल जाणून घेणेही खूप रंजक आहे.