नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणा-यांचा खिसा आणखी हलका होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांकडून जास्त भाडे वसूल करण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केला आहे. 


खिशावर असा पडणार भार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवाशांना खालची सीट (लोअर बर्थ) हवी असेल तसेच उत्सवांच्या सीझनमध्ये प्रवास करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागू शकतात. रेल्वेच्या यासंबंधी एका समिती या सिफारशी सादर केल्या आहेत. जर रेल्वे बोर्डाने या सिफारशीवर शिक्कामोर्तब केले तर प्रवाशांना खालची सीट तसेच उत्सवांच्या सीझनमध्ये प्रवास करताना अधिक पैसे द्यावे लागतील. 


विमानाप्रमाणे आवडीच्या सीटसाठी अधिक पैसे


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवाशांना पुढील सीटसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांनाही पसंतीची सीट मिळवण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागतील. तसेच काही विशेष मार्गावरील लोकप्रिय रेल्वेंचे भाडेही वाढवले जाऊ शकते.


प्रिमियम रेल्वेचे भाडे ५० टक्के?


समितीने आपला अहवाल रेल्वे बोर्डाला १५ जानेवारीला सादर केलाय. समितीने फ्लेक्सी पे प्रणालीत या बदलांच्या सूचना दिल्या आहेत. या प्रणालीत प्रिमियम रेल्वेचे भाडे ५० टक्के वाढवले जाऊ शकते. याला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे.