मुंबई : IRCTC ने रक्षाबंधनाच्या विशेष दिवशी महिलांना रेल्वे प्रवास टिकिटावर सूट देण्यासाठी विशेष कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. IRCTCचे येणाऱ्या विविध सणांवर प्रीमियम ट्रेन्ससाठी प्रवाशांना अधिक आकर्षक ऑफर देण्याचे नियोजन आहे.


 
 भारतीय रेल्वेने रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी खास ऑफर ठेवली आहे. रेल्वेची सहयोगी कंपनी IRCTC ने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिला यात्रेकरूंसाठी विशेष कॅशबॅक ऑफर लॉंच केली आहे. या ऑफरअंतर्गत टिकिटांमध्ये सूट दिली जाणार आहे.  ही कॅशबॅक ऑफर लखनऊ-दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई दरम्यान चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या महिला प्रवाशांना दिली जाणार आहे. पुढील सणांसाठीसुद्धा IRCTC कडून विविध आकर्षक ऑफरचे नियोजन करण्यात येणार आहे.
 
 IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, आज 15 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 5 टक्क्यांपर्यंत विशेष कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही कॅशबॅक ऑफर त्या महिलांसाठीही असणार आहे, ज्यांनी ही ऑफर लॉंच होण्याआधी आरक्षण केले असेल. 
 
 या ट्रेनसाठी असणार ऑफर
 तेजस एक्‍स्प्रेस लखनऊ-दिल्ली-लखनऊ (ट्रेन नंबर 82501/02) 
 आणि 
 अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद  (ट्रेन नंबर 82901/02)