नवी दिल्ली: दहावी पास झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. परीक्षा न देताच तुम्हाला इथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारी कुठे आणि कसा अर्ज करू शकतात हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वेच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये अप्रॅन्टीस पदांवर रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे असे उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. rrcser.co.in वर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 


या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2021 आहे. इच्छुक उमेदवार www.rrcser.co.in या वरून या पदांसाठी थेट अर्ज करू शकता. अप्रँटिससाठी 1785 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या साईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 


15 नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे आणि त्याच्याकडे ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असयाला हवं. 


या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याचं वय वर्षे 15 ते 24 एवढंच असायला हवं. अर्ज करण्यासाठी 100 रुपये इच्छुक उमेदवाराला फी भरावी लागणार आहे.