चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे मिळवा परत; IRCTC ची माहिती
Indian Railways: कोणत्याही कारणामुळे तुम्हाला चार्ट तयार झाल्यानंतर तुमचे ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले, तरीही तुम्ही टिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
मुंबई : Indian Railways: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द करावे लागले. तरीही तुम्ही रिफंडसाठी दावा करू शकता. अशावेळी तुम्हाला तिकीट रद्द केल्याच परतावा मिळेल.
IRCTC ने दिली माहिती
IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले की तिकीट काढल्यानंतरही रेल्वेने प्रवास न केल्यास किंवा अर्ध्यावर प्रवास सोडल्यास तिकीट रद्द करता येते आणि त्याचे पैसे परत मिळवता येतात. तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती (TDR)जमा करावी लागेल.
ऑनलाइन टीडीआर दाखल करा
यासाठी प्रथम तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जा.
नंतर होम पेजवर जा आणि My Account वर क्लिक करा.
आता ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि My transaction वर क्लिक करा.
येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील एक पर्याय निवडून फाइल टीडीआर करू शकता.
आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
येथे तुम्ही तुमचा PNR क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक OTP मिळेल.
येथे OTP टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
त्यानंतर PNR तपशील सत्यापित करा आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा
येथे तुम्हाला पेजवर परताव्याची रक्कम दिसेल.
बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला पीएनआर आणि रिफंडचे तपशील असलेला एक संदेश मिळेल.