Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे. देशाच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी रेल्वे मार्गानं जोडणाऱ्या या साधनानं सर्वसामान्यांचाही प्रवास कायमच सुकर केला आहे. किंबहुना कायमच सर्व उत्पन्न गटातील प्रवाशांना नजरेसमोर ठेवतच रेल्वे विभागानं काही नियम आणि सुविधांची आखणी केली आहे. अशीच एक सुविधा तुम्हाला ठाऊकही नसावी. हो, पण ठाऊक होताच तुम्ही याच सुविधेचा उपभोग घ्याल. इतका, की दुसऱ्या कोणत्या पर्यायालाही तुम्ही विचारातच घेणार नाही. 


या सुविधेची मदत कधी होणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या वेळापत्रकात सातत्यानं बदल होत असतात, धुकं, पाऊस आणि तत्सम अडथळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम करत असतात. त्यामुळं मग वेळेत फलाटावर आलेल्या प्रवाशांना मात्र मनस्तापाचा सामना करावा लागतो. अनेकदा Connecting Trains असतील तर आठ - दहा तासांसाठी कुठे जायचं, असा प्रश्न पडतो. अशा वेळीसुद्धा तुम्ही रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या या सुविधेचा फायदा घेऊ शकता. 


काय आहे ही खिशाला परवडणारी सुविधा? 


ही सुविधा (Railway Retiring Room) रेल्वे रिटायरिंग रूम म्हणून ओळखली जाते. जाणून आश्चर्य वाटेल, पण यासाठी तुम्हाला अवघे 25 रुपयेच भरावे लागतात. 25 रुपयांत AC रुम, कमाल आहे ना या टॉप क्लास सुविधेची? 


हेसुद्धा वाचा : Indian Railway कडून नवे नियम लागू; सामानापासून Seat पर्यंत खूप काही बदललं


देशातील बहुतांश रेल्वे स्थानकांवर रिटायरिंग रुमची सुविधा आहे. या रुमचं बुकिंग तुम्ही IRCTC च्या संकेतस्थळावरून करु शकता. इथं तुम्हाला गरजेनुसार सिंगल, डबल बेडचा रुम बुक करू शकता. याशिवाय डॉर्मिटरीचा  (Dormitory) पर्यायही इथं तुम्हाला उपलब्ध असेल. डॉर्मिटरीमध्ये एकाच मोठ्या रुममध्ये असणाऱ्या बंक बेडवर अनेक लोकांना थांबता येऊ शकतं. इथं तुम्हाला AC आणि Non AC असे पर्याय उपलब्ध असतील. 


किमान 1 तास आणि जास्तीत जास्त 48 तासांसाठी तुम्ही ही रुम बुक करु शकता. काही स्थानकांवर तुम्ही तासांच्या हिशोबानं रुम बुक करू शकता. एका PNR वर जास्तीत जास्त 6 प्रवाशांसाठी रूम बुक करता येऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला दोन डबल बेड रुम किंवा 6 सिंगल बेड रुम बुक करता येतील. 


या सुविधेसाठी किती रुपये भरावे लागणार? 


IRCTC वरून ही रुम बुक करण्यासाठी तुम्हाला 12 टक्के GST भरावा लागतो. वेळ आणि रुमचा प्रकार यावर हा दर आधारित असतो. इथं तुम्ही 12 तासांसाठी 500 रुपये आणि 24 तासांसाठी 1 हजार रुपये आणि त्यावर जीएसटी भरावा लागेल. रुम बुक करताना तुम्ही सर्विस चार्ज भरणं अपेक्षित असेल ही रक्कम 20 ते 40 रुपयांच्या दरम्यान आहे. शिवाय निर्धारित वेळमर्यादेपलीकडे तुम्ही जर बुकींग रद्द केली तर मात्र तुमच्याकडून दंडात्मक रक्कम आकारली जाईल.