Indian Railways: देशभरातील असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा भारतीय प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता जर तुम्हाला कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकतात. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबद्दल जाणून घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकजणांवर रेल्वे प्रशासन दररोज तिकीट नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करते. परंतु, तुम्ही वेटिंग तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता. हा नियम फार कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला आता प्रवास करताना तिकिटाची गरज भासणार नाही, तुम्ही आता प्लॅटफॉर्म तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता.


वाचा : धक्कादायक! 'या' खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, कोण आहे तो क्रिकेटर? 


रेल्वेच्या या नवीन नियमानुसार, जर तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी आरक्षण तिकीट नसेल तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वेमध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला तिकीट तपासनीसकडे जाऊन तुम्ही अगदी सहज बनवलेले तिकीट मिळवू शकता. हा नियम (Indian Railways Rules) रेल्वेनेच बनवला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच टीटीई शी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर टीटीई तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत तिकीट तयार करेल.  


सीट रिकामी नसल्यास इतर पर्याय


ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, टीटीई तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकते. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षित तिकीट नसेल, तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे लागते. रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.