Indian Railway : आशिया (Asia) खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी ओळख असणाऱ्या (Indian Railway) भारतीय रेल्वेबाबत दर दिवशी नवी माहिती आणि काही नवे नियम समोर येत असतात. भारतीय रेल्वेचं जाळ जगभरात चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं Railway Network आहे. देशभरातील विविध भागांना रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या भारतीय रेल्वेमुळं आजच्या घडीला देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी सहजपणे पोहोचणं शक्य होत आहे. स्वातंत्र्यपूर्व, अगदी ब्रिटीश काळापासून सुरु असणारी रेल्वे वर्षानुवर्षांमध्ये बदलली आणि तिचं रुपडंही पालटलं. इंग्रज देश सोडून गेले, पण ही रेल्वे मात्र देशात सातत्यानं धडधडत राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही इंग्रजांच्या मालकीच्या काही गोष्टी आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे भारतातील एक रेल्वे ट्रॅक. या रेल्वे रुळाची मालकी भारत सरकारकडे नसून ती ब्रिटनमधील एका खासगी कंपनीकडे आहे. (Shakuntala Railway track) शकुंतला रेल्वे ट्रॅक असं या रेल्वे मार्गाचं नाव. (Indian Railway shakuntala railway track is still owned by britishers know details latest Marathi news)


महाराष्ट्रातून जातो हा रेल्वे मार्ग 


महाराष्ट्रातील अमरावती (Amaravati) ते मुर्तजापूर या साधारण 190 किमी अंतरावर हा रेल्वे मार्ग असून शकुंतला ट्रॅक अशी त्याची ओळख आहे. या रेल्वे मार्गावर 2020 पर्यंत पॅसेंजर ट्रेन चालत होती. स्थानिकांना दैनंदिन प्रवासासाठी या रेल्वेची बरीच मदत व्हायची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत सरकारनं हा रेल्वे मार्ग खरेदी करण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या वाट्याला यश आलेलं नाही. 


हेसुद्धा वाचा : Sana ramchand gulwani: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट  


 


ब्रिटीश काळापासूनच अमरावती भागात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या काळात मुंबईच्या बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून साहेबांनी हा रेल्वे मार्ग बनवून घेतला. ब्रिटनच्याच क्लिक निक्सन एँड कंपनीनं हा मार्ग साकारत सेंट्रल प्रोविंस रेलवे कंपनी (CPRC) ची स्थापना केली. 1903 मध्ये सुरु झालेलं हे काम 1916 मध्ये पूर्ण झालं. 


स्वातंत्र्यानंतरचा 'तो' करार... 


आता तुम्ही म्हणाल देश स्वातंत्र्य झाला तरीही मालकी हक्क ब्रिटींशांकडे कसा? तर, 1947 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय रेल्वेनं हा रेल्वे मार्ग तयार करणाऱ्या कंपनीसोबत एक करार केला होता. ज्यानुसार दरवर्षी Indian Railway कडून त्या ब्रिटीश कंपनीला रॉयल्टी देण्यात येते. सूत्रांच्या माहितीनुसार रॉयल्टीची ही रक्कम साधारण 1 कोटी 20 लाख रुपयांच्या घरात आहे. 


भारताकडून या ब्रिटीश कंपनीला रॉयल्टी देण्यात आलेली असली तरीही गेल्या 60 वर्षांपासून या रेल्वे मार्गाची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळं हा शकुंतला ट्रॅक अतिशय वाईट अवस्थेत असल्याची बाब पुढे आली. परिणामस्तव या रुळावरून जाणाऱ्या रेल्वेचा वेगही ताशी 20 किमी इतकाच होता. ज्यामुळं अखेर 2020 मध्ये ही रेल्वेसुद्धा बंद करण्यात आली. पण, स्थानिक मात्र ही सेवा पुन्हा सुरु करावी हीच मागणी करताना दिसत आहेत.