Indian Railways: नोकरदार वर्गाला रक्षाबंधनापासून मंगळवारपर्यंत मोठी विकेंड सुट्टी मिळाली आहे. बहुतांश लोकांनी बाहेरगावी प्रवासाचा प्लान आखला आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीबरोबरच ट्रेनही फूल झाल्या आहेत. ट्रेनमध्ये तर तिकिट मिळवण्यापासून जागा मिळवण्यापर्यंत मारामारी करावी लागत असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेप्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची समस्या काही प्रमाणात कमी होण्यात मदत होणार आहे. 


मोठ्या सुट्टीमुळे ट्रेनने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेच्या उत्तर-पश्चिम विभागाने एकूण दहा ट्रेनमध्ये डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


या ट्रेनचे डबे वाढवले


1. ट्रेन 12957 : अहमदाबाद ते नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत 1 थर्ड क्लास एसी कोच डबा वाढवण्यात आला आहे.


2. ट्रेन 12958 : नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 14 ते 16 ऑगस्टदरम्यान 1 थर्ड क्लास एसी कोच डबा वाढवण्यात आला आहे.


3. ट्रेन 22915 : बांद्रा टर्मिनस ते हिसार दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी 1 सेकंड क्लास स्लिपर क्लास डब्याची संख्या वाढवण्यात आली आहे. 


4. ट्रेन 22916 : हिसार ते बांद्रा टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 16 ऑगस्टला 1 सेकंड क्लास स्लिपर क्लास डबा वाढवण्यात आला आहे.


5. ट्रेन 20937  : पोरबंदर ते दिल्ली सराय रोहिल्लादरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 16 ऑगस्टला 1 सेकंड क्लास स्लिपर क्लास डबा वाढवण्यात आला आहे.


6. ट्रेन  20938 : दिल्ली सराय रोहिल्ला ते पोरबंदर दरम्यान धावणाऱ्या या  ट्रेनमध्ये 18 ऑगस्टला 1 सेकंड क्लास स्लिपर क्लास डबा वाढवण्यात आला आहे.


7. ट्रेन 15715 : किशनगंज ते अजमेर दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये 12 ऑगस्टला 4 सेकंड क्लास आणि 1 थर्ड क्लास एसी कोच वाढवण्यात आला आहे. 


8. ट्रेन 15716 : अजमेर ते किशनगंज दरम्यान चालवणाल्या जाणाऱ्या या ट्रेनमध्ये 15 ऑगस्टला 4 सेकंड क्लास आणि 1 थर्ड क्लास एसी कोच वाढवण्यात आला आहे. 


9. ट्रेन 12016 : अजमेरपासून नवी दिल्लीपर्यंत धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये 15 ऑगस्टला 1 वातानुकूलित कोच जोडण्यात आला आहे. 


10. ट्रेन 12015 : नवी दिल्ली ते अजमेरदरम्यानच्या शताब्दी एक्सप्रेसला 16 ऑगस्टला 1 वातानुकूलित कोच जोडण्यात आला आहे.